सोलापूर : एसआरपीएफ जवानाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. सोलापुरात जवानाने मेव्हण्याच्या मित्राची गोळी झाडून हत्या केली होती. ऊसाच्या शेतातून पळून जात असताना पोलिसांनी आरोपीला पकडलं.

काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे हा प्रकार घडला. गुरुबा महात्मे असे एसआरपीएफच्या जवानाचे नाव आहे. नितीन बाबुराव भोसकर याची गुरुबाने गोळी झाडून हत्या केली. यामध्ये गुरुबाचे मेहुणे बालाजी महात्मे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

कसं पकडलं?

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मेव्हण्याच्या मित्रावर गोळीबार करणाऱ्या मुंबई येथील राज्य राखीव दलाच्या जवानाला पोलिसांनी पकडलं. ऊसाच्या शेतातून पळून जात असताना वैराग पोलिसांनी एसआरपीएफ जवानाला ताब्यात घेतले आहे.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

आरोपीकडून फायर केलेले पिस्तूल, 26 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. गुरुबा महात्मे असे एसआरपीएफच्या जवानाचे नाव आहे. घरात वाद सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हण्याच्या मित्राचा गोळी घालून जीव घेतला होता, तर मेव्हणा गंभीर जखमी झाला आहे.

साताऱ्यात जवानाची हत्या

याआधी, सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जवानाच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच भावजय आणि मेहुण्याच्या साथीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. संदीप जयसिंग पवार यांचा अज्ञातांच्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

साताऱ्यातील सैदापूर येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे जवान संदीप जयसिंग पवार हे गावी सुट्टीवर आलो होते. 27 डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन त्यांना जखमी केले, असा बनाव रचला होता. त्यानंतर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.