अलिबाग:  (प्रवीण रा. रसाळ) गोविंदबंदर बायपास रोड येथे राहणाऱ्या तरुण मुलीला भूरळ पाडून ठिकरूळ नाका येथील आदित्य याने २०१८ साली तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

भेटीगाठी वाढत गेल्या, जवळीक निर्माण होऊ लागली, प्रेमाचा आणाभाका झाला, सुरवातीला सारे काही सुरळीत वाटत असल तरी हळूहळू आदित्य पीडित तरुणीला वेळीवेळी नवनवीन कारण देऊन पैसे उकळू लागला, आज-उद्या पैसे परत करेल अशी सुरवातीला दिलेली वचन ही नंतर भंग पावू लागली व नंतर सरळ-सरळ भांडण, लहान भावाला जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार घडू लागले.

आपली फसवणूक होत आहे असे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली व आदित्य विरोधात तक्रार नोंदवली, रोख रक्कम, दागिने व इतर ऐवज मिळून आदित्यने सदर तरुणीस आजवर ३ लाख ९४ हजाराची फसवणूक केल्याचे लक्षात आले.

अधिक वाचा  देशात १२७.६१ कोटी लसमात्रा; निम्म्याहून अधिक प्रौढांचे लसीकरण

दरम्यान अलिबाग पोलिसांनी सदर तरुणास तत्काळ अटक करून त्यावर गुन्हा दाखल केला आहे.