कल्याण :  जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तसेच मोहोणे, आंबिवली, अटाळी, म्हारळ, टिटवाळा व आजूबाजूच्या परिसरांना पुराच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला होता, ज्यामध्ये जवळपास १५ हजारहुन अधिक नागरिक बाधित झाले होते. पुरानंतर लगेचच सर्व परिसराची पाहणी करत पंचनामे ही तयार करण्यात आले होते. व बाधित कुटुंबास प्रत्येकी दहा हजार याप्रमाणे १६ करोड ३६ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे मदत पोहोचण्यास बाधा येत होती.

योग्य शहानिशा करून आजवर पाच हजार बाधितांना मदत पोहोचली असून या दिवाळी दरम्यान नऊ ते दहा हजार बाधितांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पोहोचवण्यात येईल अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत नमूद केली आहे, तरी येत्या दिवाळीत पूरग्रस्तांना मदत मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  पुणे : दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार