मोदींनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाई नगरपरिषदेवर अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असलेले राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून, अंबाजोगाई नगरपरिषदेसह केज विधानसभा मतदारसंघातही पक्ष एकहाती विजय मिळवेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांनी त्यांचे शेकडो सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. अजितदादा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  मराठा आंदोलनाचा फटका नको ‘आपली’ मते सकाळीच उरका! राज्यभर मंदिरात बैठका घ्या या ३६ संघटना सक्रिय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेले जुने कार्यकर्ते यांच्यावर कोणताही अन्याय न होऊ देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय बनसोडे यांच्यासह आमदार सतीशभाऊ चव्हाण, आ. संजयभाऊ दौंड, आ. संदीपभैय्या क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार बसवराज पाटील, मा.आ. पृथ्वीराज साठे, मा.आ.सय्यद सलीम, मा.आ. राजेंद्र जगताप, मा.आ. संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब चव्हाण, शिवाजी सिरसाट, सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे, तसेच राजकिशोर मोदी व विजय चव्हाण यांच्यासमवेत प्रवेश केलेले सर्व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  राजकीय पक्षांच्या खर्च नियंत्रणाची सर्व नियमावली ठरली; प्रचारक माणसांचा ‘रेट’ नाश्ता जेवण मंडप होर्डिंगचे हे दर

यांचा झाला पक्षप्रवेश…

अॅड . विष्णूपंत सुभानराव सोळंके, मनोज मोहनलाल लखेरा, महादेव निवृत्तीराव अदमाने, वाजेद खतीब, धम्मपाल सरवदे, सुनिल सुरेशराव व्यवहारे, अमोल विजयकुमार लोमटे, दिनेश मोतीलाल भराडिया, संतोष रानबा शिनगारे, प्रकाशचंद्र बालचंद सोळंकी, प्रा. वसंतराव बळीराम चव्हाण, हाजी महेमूद साहब, अरुण रामकृष्ण काळे, किशोर मुन्नालाल परदेशी, विजयकुमार शिवनारायण लखेरा, शेख खालेद ताहेर, चाऊस शेख, दगडूभाई समियोदीन खतीब, अशोक भागूराम जेथे, राजेंद्र विठ्ठलराव मोरे, गणेश शंकरराव मसने, डॉ . राजेश मधूकरराव इंगोले, शेख जमील भाई, महादेव धांडे, अजयसिंह दिख्खत, शिवाजी तुळशीराम गायकवाड, माणिक शेषेराव वडवणकर, रूपेश चव्हाण, सारडा कचरु हिरालालजी, वाघाळकर सुनिल बाबूराव, राणाप्रताप दगडू चव्हाण, गोविंद लिंबाजी पोतंगळे, औदुंबर अविनाशराव मोरे, सचिन विलासराव जाधव, रशीद खान पठाण ( सुगांव ), दिनेश घोडके, भारत बालासाहेब जोगदंड, महेबूब गवळी, मुख्तार शेख, जावेद गवळी, रफिक गवळी, शेख अनिस गुत्तेदार, कैलास नाना काबंळे, चंद्रकांत व्यंकटराव महामुनी, विशाल बबूवान पोटभरे,अॅड . सतिश घोगरे, अकबर पठाण, अश्विन सांवत, अशोक राजाराम देवकर, यांसह विविध तालुक्यातील पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आदींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश संपन्न झाला.