पुणे – छायाचित्र नसल्यामुळे कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जात नाही. निवडणूक विभागाच्या सर्वेक्षणात मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे दिसून आल्यावरच किंवा मृत असल्यावरच नाव वगळण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत तसेच मतदार जागृती मंच आणि औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, परराज्यांतून किंवा जिल्ह्यातील इतर भागातून पुणे शहरात येणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. कामगारांना मतदार नोंदणी, मतदान केंद्र आणि त्यांच्या मतदानाच्या हक्काविषयी जागृत करणे आवश्यक आहे. उद्योगांनी कामगारांना त्यांच्या राहत्या ठिकाणी मतदार नोंदणीसाठी अनुकूल वातावरण करावे.

अधिक वाचा  राज्य सरकारचा निर्णय: करोनाने मृतच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

१ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२२ या दिनांकावर आधारित मतदार नोंदणी सुरू

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणार

५ जानेवारी २०२२ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार

औद्योगिक आस्थापनांनी हे करावे

कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मतदार नोंदणीसाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करावा.

मतदार जागृतीविषयक माहिती कामगारांपर्यंत पोचवावी

मतदार नोंदणीसाठी एक किंवा अधिक उद्योगांनी मिळून शिबिराचे आयोजन करावे.

मतदार नोंदणीसाठी nvsp.in संकेतस्थळ किंवा ‘वोटर हेल्पलाइन मोबाईल ॲप

अधिक वाचा  26/ 11 च्या शहीद शूरवीरांना 180 रक्तदानाचे अभिवादन

दिव्यांग नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी पीडब्ल्यूडी ॲप उपलब्ध

नवीन मतदार नोंदणीसाठी जन्मतारीख आणि निवासाचा पुरावा आवश्यक