पुणे : महापालिकेतर्फे मुळा मुठा नदीचे साबरमती नदीच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्यात येणार आहे, त्याच डीपीआर तयार करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पावर शहरातील सामाजित संस्थांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत, पण पूर्ण माहिती दिली जात नाही.

दरवेळेस सल्लागाराकाडे बोट दाखवले जात आहे. हा प्रकल्प पर्यावरणास हानिकारक आहेच शिवाय भविष्यात गंभीर पूरस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिल्यानंतरच हा प्रकल्प झाला पाहिजे अशी मागणी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सजन नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार, श्‍यामल देसाई यांनी याप्रकल्पावर आक्षेप घेतला.

अधिक वाचा  दबंग गर्ल' होणार 'खान कुटूंबियांची' सून?

वेलणकर म्हणाले, या प्रकल्पाचे महापालिकेकडून आमच्या समोर सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी महापालिकेला अडीचशेहून अधिक प्रश्न विचारले आहेत. मात्र, एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. हा प्रकल्प अडीच हजार कोटीचा असताना यासाठी ४ हजार७२७ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद का मंजूर केली. हा प्रकल्प करताना पाटबंधारे विभागाने नदीत भराव टाकू नये, बांधकाम करू नये अशा अटी टाकल्या आहेत. ते महापालिकेने मान्यही केले आहे, पण डीपीआरमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही बाजूने भराव टाकला जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या प्रकल्पास एसईआयएए या संस्थेने पर्यावरणीय मंजुरी देताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रदूषणामुळे नदीला आलेले विद्रूप स्वरूप दूर करण्यापेक्षा, या नदीच्या मूळ आजारपणाकडे दुर्लक्ष करून तिच्या सुशोभिकरणावर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत, यामध्ये नेमके कोणाचे हीत आहे, असा प्रश्‍न यादवडकर यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  इतिहासातील सर्वांत मोठी 41 टक्के वाढ; विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

एकीकडे महापालिका बांधकाम करणार नाही असे सांगत असताना प्रत्यक्षात अठरा लाख चौरस मीटरचे बांधकाम प्रस्तावित आहे. यामध्ये अनेक संशयास्पद तरतूदी आहेत. याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी कुंभार यांनी केली.