मुंबई: बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी तसेच संघाची उपसमिती “संस्कार समिती” यांच्या संयुक्त विद्यमाने अंकुर बुद्धविहार नायगाव, मुंबई – १४ येथे दि. २५ जुलै २०२१ रोजी प्रारंभ झालेल्या आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या वर्षावास प्रवचन मालिकेची सांगता दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी मा. दिपक मोहिते (कार्याध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली श्रावस्ती बुद्धविहार, रमाबाई कॉलोनी, घाटकोपर येथे झाली.

सर्वप्रथम सूत्रसंचालक मा. संजय तांबे (सरचिटणीस बौ. स. संघ) यांनी कोरोना महामारी तसेच महापुरात नाहक बळी पडलेल्या मृताम्यांस भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली, बौद्धाचार्य संदिप गमरे गुरुजी, मनोज पवार गुरुजी तसेच त्यांच्यासोबत कैलासचंद्र मोहिते, सुविधा कदम या संस्कार समितीच्या सर्व सहकाऱ्यांनी सुश्राव्य वाणीने धार्मिक विधी पार पाडला, तदनंतर स्वागताध्यक्ष संदीप गमरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

अधिक वाचा  पतित पावन तर्फे अधिकाऱ्यास घेराव

सदर प्रसंगी मा. संजय पवार (प्रमुख विश्वस्त) यांनी आपल्या भाषणातून प्रभावी मार्गदर्शनात्मक विचार मांडले, संघाचे विश्वस्त रामदास गमरे, के.सी. जाधव, मुकुंद पवार, कोषाध्यक्ष संदीप पवार, शशिकांत मोहिते (अध्यक्ष, न्यायदान कमिटी), नितीन नागे (अध्यक्ष, शिक्षण समिती), महादेव सुमे (विवाह मंडळ अध्यक्ष), विभागाधिकारी अजय जाधव, राजेंद्र जाधव, संतोष जाधव, धर्मानंद जाधव (मळण भावकी अध्यक्ष), उदय कांबळे (स्थानिक विहार कमिटी अध्यक्ष) अनिल गमरे (उपाध्यक्ष स्थानिक विहार कमिटी), सचिन मोहिते, दिपाली लोखंडे (केंद्रीय शिक्षिका), नारायण जाधव गुरुजी, वैशाली जाधव (स्थानिक कार्यकर्त्या) आदी मान्यवरांनी आपल्या विचारातून प्रवचन मालिकेत बारा व्याख्यात्यानी सादर केलेल्या बारा सत्रांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे संघप्रिय रामजी कदम (पेवे), संदीप गमरे (वाकी), दीपक मोहिते (कौंढर) यांनी सुमधुर आवाजात गीतगायनाने लोकांना मंत्रमुग्ध केले.

अधिक वाचा  अभिजीत बिचुकलेंना करोना; हिंदी ‘बिग बॉस’ मध्ये राखी सावंतची निवड

शेवटी कैलासचंद्रजी मोहिते तसेच मनोज पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून संस्कार समिती तसेच उपासकांच्या माध्यमातून बुद्ध गाथा व सरणत्तम घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.