(प्रतिनिधी) : पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष युवा नेते राहुल शेवाळे यांच्या आयोजनामधून पुरंदर व हवेली तालुक्यातील  सुमारे एकशे पस्तीस गावात मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार कार्यक्रम आयोजित केला होता,या योजनेअंतर्गत विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या. तसेच मोफत सॅनिटायजर व मास्कचे वाटप हजारो नागरिकांना  करण्यात आले आहे.या आरोग्य योजनेचा लाभ पन्नास हजार नागरिकांनी घेतला . गेली ऐंशी दिवस प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर जावून तीन हजार किलोमीटरचा प्रवास या आरोग्य रथाने केला आहे .

नागरिकांच्या समस्या अडचणी लक्षात घेऊन राहुल शेवाळे यांनी शेवाळेवाडी येथे मोफत मेगा लसिकरण मोहिम कार्यक्रम आयोजित केला व असंख्य नागरिकाचे लसिकरण करून घेतले या प्रसंगी माजी उपसरपंच संजय कोद्र,विलास तात्या शेवाळे,राम खेडेकर,दिंगबर शेवाळे, राजेंद्र शेवाळे,महेश मेमाणे, संतोष ढेकणे, अशोक खाडे, कैलास जैस्वाल,लक्ष्मण देवकर, बबनराव होले,नाना अवचर, अण्णापाटील शेवाळे,एच एन प्रसाद,भारत कोद्रे  , अविनाश कोद्रे, डॉक्टर अमोल जोशी,  कोर टिमचे संदेश पवार ,सिद्धार्थ गायकवाड,अनुज जयस्वाल,शिवपुजन सिंग,यांच बरोबर महिला वर्ग हि मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शेवाळे वाडी परिसरामधून भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवानेते राहुल शेवाळे यांचे नागरिकांनी मधून आभार व्यक्त केले जात आहे.

अधिक वाचा  ‘आरटीई’च्या प्रवेशांस पॅनकार्ड बंधनकारक