पुणे: वारजे कर्वेनगर भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक उपाय केले जात असतानाच या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी कायमच आणि दीर्घकालीन उपाय म्हणून गरज असलेला आंबेडकर चौक-तिरूपती नगर–शनीमंदीर-सिप्ला फाऊंडेशनच्या मागील रस्ता पूर्ण होत आहे. कर्वेनगरपासून सपना सोसायटी पर्यंत या रस्त्याचे काम 95% झाले आहे. आदित्य गार्डन सिटी, अतुलनगर व आर एम डी सिंहगड कॉलेज या भागातील नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणारच पर्यायाने मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे असे स्थानिक नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी सांगितले. आज या रस्ताची पहाणी करताना पथ विभागाचे डोंबे साहेब, भास्कर हांडे, महेश झोमान, नगरसेवक राजाभाऊ बराटे,जेष्ठ नागरिक राजेंद्र चिवटे यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

कर्वेनगर भागातून वारजे शिवणे भागाकडे जाणारी सुमारे 40% वाहतुक ही माळवाडी, राजयोग सोसायटी, आदित्य गार्डन सिटी, गोकुळ नगर, वाराणसी सोसायटी या भागातील नागरिकांची आहे. या नागरिकांना कर्वेनगर मधून थेट डुक्कर खिंड येथे जाणे शक्य असून फक्त यामध्ये. 200 फुट कच्चा रस्ता बाकी आहे. सध्या जागा मालकासोबतही बोलणी सुरू आहे. त्यानंतर दिवाळी नंतर डांबरी रस्ता पुर्ण होईल.

कर्वेनगर भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने कर्वेनगर भागात उड्डाणपूल बांधण्यात आला परंतु कर्वेनगर चौकातील वाहतूक कोंडी आंबेडकर चौकात फक्त स्थलाांतरित झाली. त्यामुळे आंबेडकर चौक ते वारजे मुख्य चौक हा सतत वाहतूक कोंडीने व्याप्त रस्ता असून या भागातील व्यावसायिकांनाा ही त्याचा फटका बसत आहे. या भागातील रस्ता रुंदीकरण काही कारणास्तव रखडल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी सोडविण्यसाठी हा पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात असलेल्या तिरुपती नगर – आर एम डी कॉलेज या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून या रस्त्याचा वापर झाला तर मुख्य कर्वे रस्त्यावरील 40% वाहतूक स्थलांतरित होण्यास मदत होणार आहे असेही राजाभाऊ बराट यांनी सांगितले.