हडपसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या  स्वच्छ भारत अभियान या समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी  पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष  राहुल  शेवाळे यांची  निवड करण्यात आली आहे.

  स्वच्छ भारत अभियानचे राष्ट्रीय संयोजक खासदार  यशवंतसिंह दरबार यांच्या हस्ते राहुल शेवाळे यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी बेटी बचाव बेटी पढाव चे प्रमुख  राजेंद्र फडके, सॅल्युट तिरंगा चे प्रमुख  राजेश झा, अभियानाचे प्रदेश अध्यक्ष मच्छिंद्र दगडे पाटील,प्रदेश संयोजक  सचिन देशपांडे ,विजय  कुलकर्णी, वैभव मुरकुटे ,कांचन कुंबरे , स्वप्नील  शहा. किरण दगडे, प्रसाद सरमोदक, आदीजण उपस्थित होते. या समिती अंतर्गत नद्या ,तलाव यांची स्वच्छता करण करणे,महिलांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करणे, सॅनिटरी नॅपकिन्स याचे निर्मूलन करणे, रोज निर्माण होणारा कचरा यावर उपायोजना करणे, तसेच राज्यातील गड व किल्ले यांचे संवर्धन व स्वच्छता करणे, बेटी बचाव बेटी पढाव याचे काम वाढविणे ही कामे होत असून त्यासाठी केंद्र सरकारने करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याच समितीच्या माध्यमातून लवकरच इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी  केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहोत. तसेच  राज्यातील सर्व गड व किल्ले यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहोत. असे नवनियुक्त अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.

अधिक वाचा  कर्नाटकात ओमिक्रॉन : 2 आठवडे भारताला महत्त्वाचे- आरोग्य तज्ज्ञ

चौकट
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.
या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे. घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल… शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी संकल्पलेल्या या अभियानाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल यासाठी समिती कार्यरत राहणार आहे.