पुणे शहर आणि आसपासच्या भागाला मुसळधार पावसाने सायंकाळी सहा वाजल्यापासून झोडपून काढले.या पावसामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.तर याच पावसाचा फटका,राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना देखील बसला. नगर रोडवरील वाहतूक कोंडीत अजित पवार हे तब्बल तासभर अडकून पडले होते.

पुणे शहरातील उपनगर भागाला आजच्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे औरंगाबाद येथील कार्यक्रम उरकून, लोहगाव येथील विमानतळावर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आले. तेथून भोसलेनगर दिशेने घरी जाण्यास निघाले.मात्र पावसाचा जोर कायम होता.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? फडणवीसांचे पहिल्यांदाच सविस्तर उत्तर

अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा विमानतळपासून काही किलोमीटर पुढे येत नाही. तोवर नगर रोडवरील शास्त्री नगर चौकातील वाहतुक कोंडीत अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा तब्बल तासभर अडकून पडला. अजित पवारांच्या वाहनांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले.

या मुसळधार पावसाचा जसा सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.तसे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जावे लागले हेच म्हणावे लागले.