गृहमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला आज उत्तर प्रदेश पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली. पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर अजय यांना चौकशीला सामोरे जावे लागले. अजय हे आज सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी दिवसभर त्यांची चौकशी केली, मात्र यावेळी चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. सहारनपूरचे डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप आशिष मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी आशिष मिश्र यांच्या घरी नोटिस पाठवून त्यांना होण्यास सांगितलं होतं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात जी काही पावले उचलली ती समाधानकारक नसल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

राज्य सरकारने डीजीपींनी या प्रकरणातील पुरावे सुरक्षित ठेवावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने घेतलेल्या कठोर भुमिकेमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाईसाठी पावलं उचलायलं सुरूवात केल्याचं दिसतं आहे.