आंबेगाव (प्रतिनिधी) : ॲक्टिव्ह फाउंडेशन, भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि सदगुरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विधमानाने नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून लिपाणेनगर आंबेगाव याठिकाणी महिलांसाठी डोळे तपासणी, त्वचारोग, दातांच्या विकासाचे निदान आणि विविध आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात तज्ञ डॉक्टरांची सेवा उपल्ब्ध करण्यात आली होती. शिबीरात जवळपास 240 शिबीरार्थीनी उपस्थिती लावली. शिबीरामध्ये विषेश उपस्थिती महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली.

मोफत आरोग्य तपासाणी शिबीराचे उद्घाट्न डॉ विरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विविध प्र्कारच्या रक्त तपासण्या ब्लड शुगर तपासणी, RBC, CBC,BMD, BMI, ECG आणि नस संवेदना चाचणी इ. सुविधा आवश्यक निवडक रुग्णांना मोफत उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच एक्स रे , 2 डी इको आणि सोनोग्राफी ( X-Ray, 2D Echo and Sonography) चाचण्या ख़ास सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मोठ्या शस्त्रक्रियासाठी 50% सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असून मोफत शारिरीक आरोग्य तपासणी , रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी, चश्मे वाटप , आणि दंत चिकीत्सा इ सुविधाही शिबीरार्थीना उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

शिबीरात खासकरुन अपचन , पोटच्या तक्रारी, डायबेटीज आणि सकस आहार याविषयीही तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत होते. भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि सदगुरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्यविषयी विशेष टिप्स देण्यात येत होत्या. निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी, व फॅमिली डॉक्टरशी सल्ला मसलत आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

लिपाणे नगर आंबेगाव नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्ह्णून अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील असे आयोजकांमार्फत ॲक्टिव्ह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मारुती लिपाणे यांच्या मार्फत आश्वासित करण्यात आले. शिबीरात सर्व सहकारी आणि सह प्रायोजक संस्थेमार्फत डॉ अमित पालेवाल, डॉ संतोष मुळीक, डॉ मृदुला कुलकर्णी, डॉ शीतल कुदाले, डॉ अभिषेक शिष्टी आदी तज्ञ डॉक्टरांचा सह्भाग विशेष उल्लेखनिय होता. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲक्टिव्ह फाउंडेशन कार्यकर्तेनी परिश्रम घेतले.यावेळी कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.