पुण्यातील एका तरुणानं अवघ्या 50 हजार रुपयांत आलिशान कार (buy fortuner car in just 50,000 Rs) आपल्या घरी आणली आहे.

पुणे, 09 ऑक्टोबर: महागड्या गाडीत ऐश करत फिरावं, आपल्याकडेही मोठ्या ब्रॅंडच्या गाड्या असाव्यात असं अनेकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण आपल्या आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतात. तरीही त्यांना अशी आलिशान गाडी घेता येत नाही. पण पुण्यातील एका तरुणानं मात्र अवघ्या 50 हजार रुपयांत आलिशान कार (buy fortuner car in just 50,000 Rs) आपल्या घरी आणली आहे. पण ही कार घरी आणण्यासाठी तरुणानं केलेला कांड ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

खरंतर, पुणे जिल्ह्याच्या दौंड येथील रहिवासी असणाऱ्या एका बड्या शेतकऱ्यांनं काही दिवसांपूर्वी अलिशान फॉर्च्युनर कार खरेदी केली होती. पण काही वैयक्तिक कारणांसाठी त्यांनी ही कार विकायची ठरवली. यासाठी त्यांनी ग्राहकही शोधला आणि 12 लाखांत या कारचा सौदाही पक्का करण्यात आला. यासाठी रोख रक्कम म्हणून दोन लाख रुपये रोख देण्याचं ठरवलं. पण हा सौदा संबंधित शेतकऱ्यांना महागात पडला असून त्याची गाडीही गेली आणि कारही गेली आहे.
आरोपी तरुणानं दोन लाखांऐवजी 50 हजार रुपये शेतकऱ्याला रोख दिले. आणि उरलेली सर्व रक्कम टप्प्याटप्प्याने हफ्त्याच्या स्वरुपात देतो असं सांगितलं. शेतकऱ्याला विश्वासात घेत आरोपीनं गाडीही आपल्या नावावर करून घेतली आणि अवघ्या 50 हजारांत महागडी आलिशान गाडी आपल्या घरी घेऊन आला. यानंतर आता 50 हजार रुपयांत फॉर्च्यूनर गाडी घरी घेऊन आलेला व्यक्ती एकही हफ्ता भरायला तयार नाहीये. यामुळे फिर्यादी शेतकऱ्याची साडे अकरा लाखांची फसवणूक झाली आहे.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

या प्रकरणी दौंड तालुक्यातील देऊळगाव ताडा येथील रहिवासी असणाऱ्या सुरेश जाचक यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. शेतकऱ्याच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पाटस येथील खारतोडे वस्तीवरील रहिवासी असणाऱ्या संपत दत्तू खारतोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.