पुणे: भारतातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर देशातील सर्व लोकांचा विकास संकल्प केल्याने आज तळागाळातील लोकांपर्यंत सरकारचे काम पोहोचत असले तरीही आज भारत मातेच्या मुलींचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज बनत असून यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे मत बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्रजी फडके यांनी व्यक्त केले. स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव व सल्यूट तिरंगा महाराष्ट्र राज्य समिती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वच्छ भारत अभियान समितीचे समितीचे राष्ट्रीय संयोजक मा.खासदार यशवंत सिंग दरबार, सॅल्यूट तिरंगा चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी झां, मा.डिम्पी जी बजाज, राजेश राय, स्वच्छ भारत अभियान समितीचे समितीचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक, प्रदेशाध्यक्ष धनंजय दगडेपाटील, अध्यक्ष सचिन देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, अल्पनाताई वरपे, किरण दगडेपाटील, स्वप्नालीताई सायकर, वृषालीताई चौधरी, जयंत भावे, स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, बाळा टेमकर, सचिन दांगटपाटील, स्वच्छ भारत अभियान समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रसाद सरमोकदम, सल्लागार विश्वास पिटके, सहसचिव पै.विशाल उभे, सहसचिव देवेंद्र राजभर, प.महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शेवाळे, पुणे शहर मिहिला अध्यक्षा कांचनताई कुंबरे, पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल शहा, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र रेडके, पुणे शहर संघटन सरचिटणीस सागर कडु, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस शरद भोते, सरचिटणीस निलेश गोतारणे, ममताताई दांगट, गोरख दगडेपाटील, समिर पाटील, राजेश कुलकर्णी, उल्का मोकासदार, गणेश कोकाटे, सुत्रसंचालक हिमानी चोंधे, सोनाली छत्रे, तसेच, सुरेंद्र कंधारे, राजेश मनगीरे, नितीन भुंडे, अमरजा पटवर्धन, सुहासिनी शिरढोनकर, गायत्री सणस, आदित्य काळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' प्रवाशाला  पुण्यात होम क्वारंटाईन

यावेळी बोलताना राजेंद्रजी फडके म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेला कायम वंदन केले जात असतानाही लोकसंख्येच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होणे ही खेदाची बाब असून यावर काम करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव हा अभिमानस्पद उपक्रम सुरू केला असून यामध्ये भरीव काम करण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. स्वच्छता सैनिक पुरस्कार व देशातील सर्व राज्यांमध्ये हा अभिनव उपक्रम अत्यंत स्तुत्यरित्या राबवल्या जात असताना महाराष्ट्रातील महाभकास आघाडीच्या वतीने मात्र या योजनेला केराची टोपली दाखवण्याचे काम केले जात आहे.

अधिक वाचा  एकावर एक फ्री थाळी चांगलच महागात; तब्बल ८९ हजारांचा ग्राहकाला गंडा

महाराष्ट्र सरकार महिला सुरक्षा करण्यासाठी दुर्लक्ष करत असल्याने दिवसेंदिवस राज्यातील महिला असुरक्षित होत असून त्यांना आधार आणि संरक्षण देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर येऊन पडली आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मोदी यांनी देशातील महिला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले असून देशातील महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांमध्ये या विषयावर भरपूर काम केले जात आहे. महाराष्ट्राचे हे दुर्दैवी आहे कि, एवढी प्रभावी महिलांची परंपरा महाराष्ट्राला असतानाही महाभकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिला सुरक्षित नसणे ही दुःखाची खेदाची बाब आहे.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव बेटी पढाव या कार्यकारणीने जर संकल्प केला तर राज्यातील प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित ठेवणे शक्य आहे. मात्र याबाबत प्रामाणिक काम करण्याची गरज असल्याचे सांगत आपल्या परिसरातील सर्व महिला व मुली सुरक्षीत करण्याचे आव्हानही राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र फडके यांनी केले. यावेळी राज्यस्तरीय व तालुकास्तरीय पद वाटप सोहळा, गुणवंत विद्यार्थिनी सन्मान सोहळा, स्वच्छता सैनिक सन्मान सोहळा, देशसेवा सैनिक परिवार सन्मान सोहळाही पार पडला.