पद …..असो वा नसो सत्ता …..असो वा नसो पण जनसेवा हाच ध्यास आणि सर्वसामान्याच्या अडचणीला कामी येणे म्हणजेच विकास!….. उक्ती प्रमाणे वारजे कर्वेनगर भागांमध्ये गेली दोन दशके एक निष्ठावान आणि मितभाषी नेतृत्व प्रदीप (बाबा) धुमाळ काम करत असून आज त्यांचा वाढदिवस. वारजे जसं बदललं त्याप्रमाणे या भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळत गेल्या त्या संधीचं सोनं करत आजही गेली दोन दशके प्रदीप (बाबा) धुमाळ या भागात सार्वजनिक काम करत आले. सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ते गोरगरीब, दीन दुबळे, अडी-अडचणीच्या लोकांना अशा पद्धतीने वाटचाल करत असून त्यांच्यामार्फत दिवसेंदिवस समाजहिताचे कार्य घडतच आहे.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

सत्ता आल्यानंतर नेतृत्वाच्या वागण्या-बोलण्यात आणि कार्य कृतीमध्ये बदल सर्वांनी पाहिलेले असताना प्रदीप (बाबा) धुमाळ यांच्या बाबतीत मात्र या गोष्टीचा लवलेशही दिसत नाही. सांप्रदायिक विचारसरणी आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना याबाबत जिव्हाळा जाणवतो.