महाराष्ट्रातील मुळशी तालुका येथील खारवडे गाव खारवडे म्हसोबा देवस्थान तिर्थक्षेत्र ब खुप दिवसानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले . तब्बल दीड वर्षानंतर भाविकांना खारवडे म्हसोबा देवस्थान येथे देवाचं दर्शन मंदिरा मध्ये जाऊन घेता येणार आहे. यावेळी भाविकांचा जनसागर परिसरात लोटला होता.

खारवडे म्हसोबा देवाची पालखीत मिरवणूक काढून ढोल-ताशांच्या गजरात घटस्थापना करण्यात आली. आज पर्यंत मुळशी तालुक्यातील खरवडे गावात अजूनही कोरोणाचा एकही पेशंट सापडला नाही ही देवाची कृपा म्हणावी म्हणून विश्वस्त आणि अध्यक्षा यांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात आलं कि जागांवरच हे करूनच संकट पूर्णपणे नाहीस होऊ दे तसेच सर्वांना जीवन निरोगी आणि सुखमय होऊदे .

अधिक वाचा  Railway Recruitment 2021: विविध पदांसाठी होणार भरती,काय आहे तपशील, जाणून घ्या

यावेळी म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुराताई भेलके, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकर मारणे, विश्वस्त वसंत मारणे, संभाजी गावडे सरपंच लक्ष्मण मारणे , उपसरपंच लता जोगावडे, शिवाजी मारणे, माऊली साळेकर, हर्षल मारणे, केदार मारणे, गुलाब मारणे, सचिन मारणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.