कर्वेनगर येथे गेली १५ दिवसांपासून बिजली चौक साईबाबा मंदिर ते मावळे आळी चौक येथील सर्व चौकोनी चेंबर तुंबले आहे. मावळे चौक ते विठ्ठल मंदिर रोड या रस्त्यावर ती गटारीच्या पाण्याचे डपके साचले आहे. नागरिकांना चालायला रस्ता नाही, संबंधित आरोग्य खात्याला अंकुश साठे यांना कळवले असता त्यांना या तक्रारींचे निवारण होत नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर च्या वतीने माननीय सहाय्यक आयुक्त वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय राजेश गुर्रम यांना  हि मलनिस्सारण वाहिनी दुरुस्त करण्याची मागणी केदार मारणे यांनी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

अधिक वाचा  फेसबुक, गूगलचा जाहिरात महसूल सर्वाधिक; भारतीय माध्यमांपेक्षा १५ हजार कोटी रुपये अधिक

उद्या जर मावळे आळी वस्ती भागांमध्ये कोणतेही आजाराची साथ आली तर त्याला सर्वस्वी पुणे महानगरपालिका वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय जबाबदार असेल, या दूषित गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे तरी आपण स्वतः लक्ष घालून परिस्थितीत नियत्रणात आणन्याची विनंती करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती केदार वसंत मारणे यांनी दिला.