मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. 10 मधील लक्ष्मीदत्त चौक ते एल.एम.डी. चौक, मेघमल्हार सोसायटी, रिद्धी – सिद्धि सोसायटी, युनिकस सोसायटी, सॅफरोन अव्हेन्यू , लक्ष्मीदत्त सोसायटी, व्हॅलोनिया सोसायटी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पानी साचले असल्याचे निदर्शनास आले व या परिसरातील नागरिकांना याचा अत्यंत त्रास सहन करावा लागला. तत्पूर्वीच या भागामध्ये नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नातून मोठ्या व्यासाची पावसाळी लाइन टाकण्याच्या कामास सुरुवात देखील करण्यात आली आहे.

सदर पावसाळी लाइनचे काम योग्यरीत्या व नियोजनबद्ध स्वरुपात व्हावे व या परिसरातील नागरिकांना किमान पुढील 25 वर्ष तरी कोणत्याही प्रकारचा रस्त्यावर पाणी साचून त्रास निर्माण होत असल्याचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पुणे मनपा पथ विभागाचे मुख्य अभियंता श्री. अभिजीत डोंबे, कनिष्ठ अभियंता सौ. प्रियंका बनते, कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री.स्वप्नील खोत यांच्यासह नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.

अधिक वाचा  आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत पुणे ग्रामीण संघ विजयी

याप्रसंगी मनीष देव , राहुल कोंडभोर, श्रीधर पंतवैद्य,गणेश बालिगा, समाधान पाटील, कुमारम गहलोत व बावधन सिटीझन फोरम व राष्ट्रसेवा प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.