मुंबई : राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेल्याचं पाहायला मिळत आहे.

पंचायत समिती पोटनिवडणूक (144 जागा)
भाजप – 33
शिवसेना – 22
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
काँग्रेस – 35
इतर – 38

कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी निवडणूक?
अकोला – 28
धुळे – 30
नंदुरबार – 14
नागपूर – 31
पालघर – 14
वाशिम – 27

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल

अकोला जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 04
शिवसेना – 05
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी काँग्रेस – 00
इतर – 19

धुळे जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 15
शिवसेना – 03
काँग्रेस – 03
राष्ट्रवादी काँग्रेस – 05
इतर – 04

नंदूरबार जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 03
शिवसेना – 06
काँग्रेस – 01
राष्ट्रवादी काँग्रेस – 04
इतर – 00

नागपूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 06
शिवसेना – 00
काँग्रेस – 02
राष्ट्रवादी काँग्रेस – 21
इतर – 02

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

पालघर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 03
शिवसेना – 05
काँग्रेस – 02
राष्ट्रवादी काँग्रेस – 00
इतर – 04

वाशिम जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 02
शिवसेना – 03
काँग्रेस – 08
राष्ट्रवादी काँग्रेस – 05
इतर – 09

मतदारांनी काँग्रेसला साथ दिली – पटोले
सहा जिल्ह्यातील जनतेचे आभार आम्ही या जिल्हा परिषद, पंचायत समितीनिमित्त एक सुरुवात केली आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक मागे पडलो. तिथेही काही दिवसांत आम्ही काम करु. खरं तर आज भाजप देशातील वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, संविधान विरोधी धोरण या सगळ्याला कांग्रेसच थांबवू शकतं हे लोकांनी मान्य केलंय. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे, असं पटोले म्हणाले.

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी ; ६२३ जणांच्या बदल्या

लोकशाहीत जनता मोठी आहे. जनतेचा विश्वास सर्वात मोठा असतो. आमच्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करुन आम्ही जनतेसमोर जाऊ, असं मी म्हटलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. आज देश बरबाद होतोय. त्याविरोधात काँग्रेस लढत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आमच्यापेक्षा पुढे आहे. मात्र पंचायत समितीत आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, असं पटोले म्हणाले.