अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे निकाल आज हाती आलेले आहेत. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयासोबतच बँकेवर आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं देखील परिवर्तन पॅनल ने सातत्याने प्रचार केला होता.

सहकार पॅनलला निवडणुकीत 13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजुन स्थापन व्ह्ययची आहे. राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ असे देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सागिलते आहे.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख आणि उत्तरा जगताप यांच्या वर ED ने नोटीस बजावल्या आहेत. मात्र विरोधकांचे सर्व आरोप नाकारत मतदारांनी आम्हाला निवडून दिले आहे. बँकेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली आमचे पॅनल शेतकऱ्या साठी काम करणार आहे असे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.

या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकुर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बँकेत चांगल्या पद्धतीने काम केले, विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. बँकेने शेतकऱ्यांसाठी काम केले येत्या काळात महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करू अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

असा आहे निवडणुकीचा निकाल – एकूण जागा 21

सहकार पॅनल – 13

परिवर्तन पॅनल – 5

अपक्ष – 3

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार

चांदुर रेल्वे -वीरेंद्र जगताप

धामणगाव -श्रीकांत गावंडे

अमरावती -सुनील वऱ्हाडे

भातकुली -हरिभाऊ मोहोड

चिखलदरा -दयाराम काळे

दर्यापूर -सुधाकर भारसाकळे

तिवसा -सुरेश साबळे

बबलूभाऊ देशमुख ओबीसी मतदार संघ

बळवंत वानखडे – अनुसूचित जाती

पुरुषोत्तम अलोणे – विमुक्त जाती

प्रकाश काळबांडे – सहकारी पत संस्था

सुरेखा ठाकरे – महिला राखीव

मोनिका मर्डिकर – महिला राखीव

परिवर्तन पॅनल

राज्यमंत्री बच्चू कडू -चांदूरबाजार

अधिक वाचा  Omicron Variant ची ही लक्षणं!; डेल्टा पेक्षा ओमायक्रोन हा फरक

जयप्रकाश पटेल -धारणी सेवा सह

रवींद्र गायगोले – व्यक्तिगत मतदार संघ

चित्रा डहाणे -मोर्शी सेवा सहकारी संघ

अजय मेहकरे अंजनगाव सेवा सहकारी

अपक्ष विजयी उमेदवार

अभिजीत ढेपे – नांदगाव खडेश्वर

नरेशचंद्र ठाकरे – वरूड

आनंद काळे – अचलपू