डावी भुसारी कॉलनी लगत असणारा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग व चांदणी चौक बहुमजली उड्डाणपूलाचे काम चालू आहे. सदर प्रकल्पामुळे या भागातील वाहतूक समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल. परंतु सध्य स्थितीत या चालू असलेल्या कामामुळे परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे व त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.

डावी भुसारी कॉलनी शृंगेरी मठ येथून महात्मा सोसायटी डी पी रोड कडे जोडला जाणारा सर्विस रोडचे काम सध्या अर्धवट परीस्थितीत होते. सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास निश्चितच चांदणी चौकातील वाहतूक कमी होऊन नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व अपघाताचे प्रमाण देखील वाढणार नाही.

अधिक वाचा  देशात १२७.६१ कोटी लसमात्रा; निम्म्याहून अधिक प्रौढांचे लसीकरण

तरी या भागात होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सदर रस्त्याचे काम प्राधान्याने करावे. अशी मागणी भारतीय राष्ट्रिय महामार्गाचे प्रकल्प संचालक मा.चिटणीस साहेब यांच्या कडे केली होती व त्याबाबत नगरसेविका सौ.अल्पना वरपे यांनी सातत्याने पाठपुरावा देखील चालू होता. या मागणीला यश येऊन प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली असून २-३ महिन्यातच सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल व फक्त भुसारी काॅलनीच नाही तर कोथरूड परिसरातील नागरीकांना या रस्त्याचा फायदा होईल असे नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे यांनी सांगीतले.