नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सेवा जगभरात अनेक तास बंद होती. मंगळवारी पहाटेपासून यातील एक एक प्लॅटफॉर्म पुन्हा सुरळित काम करू लागले. सोमवारी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला. डाउन राहिल्यानं फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची घसरण झाली. मात्र, इतके तास व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन का होतं, हे अद्याप समजलेलं नाही.

फेसबुकनं ट्विट करत म्हटलं, की जगभरातील लोक, व्यवसायिक आणि मोठा समुदाय जो आमच्यावर अवलंबून आहे, त्यांची माफी मागतो. आम्ही आमचे अॅप्स आणि सेवा पुन्हा सुरळित करण्यासाठी मेहनत घेत आहोत. आता हे सांगताना आनंद होत आहे, की या सेवा पुन्हा सुरळित सुरू झाल्या आहेत. आमच्यासोबत काम करण्यासाठी धन्यवाद.

अधिक वाचा  दुसऱ्या मात्रेकडे १ कोटीची पाठ; ५ जिल्ह्यामध्येच बहुतांश लसीकरण

फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं, की व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर पुन्हा ऑनलाईन झाले आहेत. त्रासासाठी माफी मागतो. तुम्ही ज्या लोकांची काळजी करता त्यांच्यासोबत संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या या सेवांवर किती अवलंबून आहात, याची आम्हाला कल्पना आहे.

फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Mike Schroepfer यांनी ट्विट केलं की, या सेवा बंद झाल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्वांची मी मनापासून क्षमा मागतो. आम्ही नेटवर्किंग समस्या अनुभवत आहोत आणि टीम शक्य तितक्या लवकर या सेवा सुरू करण्यासाठी काम करत आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, की फेसबुक सेवा पुन्हा सुरू झाली आहे. 100 टक्के सुरळित सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. प्रत्येक लहान-मोठे व्यवसायिक, कुटुंब आणि आमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची माफी मागतो.

अधिक वाचा  अमोल कोल्हे ट्रोल, पुणे प्रशासनावर केली टीका

याआधी सोमवारी रात्री फेसबुकनं म्हटलं होतं, की आम्हाला माहिती आहे, की काही लोकांनी आमच्या अॅप्सचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही असुविधेसाठी क्षमा मागतो.

काही तासात झुकेरबर्ग यांचं 5,21,90,70,50,000 चं नुकसान

Facebook चे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची वैयक्तिक संपत्ती काही तासांत सुमारे 7 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. भारतीय रुपयानुसार ही किंमत 5,21,90,70,50,000 रुपये इतकी होते. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नंबर घसरला आहे. सोमवारी WhatsApp, Facebook, Instagram हे फेसबुक संकलित सोशल मीडिया Apps तब्बल 7 तास बंद झाल्याने हा मोठा फटका बसला. फेसबुक संकलित सोशल मीडिया Apps तब्बल 7 तास बंद झाल्याने फेसबुकचा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरला आणि सप्टेंबरच्या मध्यापासून आतापर्यंत सुमारे 15 टक्के कमी आली.

अधिक वाचा  Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध - आरोग्यमंत्री

सोमवारी स्टॉक स्लाइडनुसार, झुकेरबर्ग यांची संपत्ती 120.9 बिलियनपर्यंत खाली आली आणि ते बिल गेट्स यांच्या खाली 5व्या क्रमांकावर आले. 13 सप्टेंबरपासून त्यांनी जवळपास 19 अब्ज संपत्ती गमावली आहे, ज्याची किंमत सुमारे 140 बिलियन डॉलर्स होती.