पुणे : कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत. आता कसलीही काळजी नाही, असा विचार करीत असाल, तर तसे करू नका. पुणे जिल्ह्यात दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ०.२५ टक्के इतके आहे. या उलट एक डोस झाल्यानंतर बाधित होणाऱ्यांचे प्रमाण हे यापेक्षा कमी आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार स्वच्छ हात धुणे या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करा, तरच तुम्ही स्वतः आणि तुमच्या स्वतःच्या संपर्कात येणाऱ्यांना सुरक्षित ठेवू शकाल.

पुण्याने कोरोनाची पहिली आणि दुसऱ्या लाटेचा भयंकर  घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. ती टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या आपल्यापुढे आहे. कोरोना बाधितांचा आकडा कमी झाल्याने सर्व जनजीवन पूर्ववत होत आहे. त्याच दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत. त्यात शाळा आणि महाविद्यालया देखील सुरू होत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या उपयोजनांचा आग्रह धरला जात आहे. तर लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन केले जात आहे.

अधिक वाचा  कर्वेनगरला विद्युत रोषणाई उदघाटन सोहळा संपन्न