मुंबई : महागाईचा भडक्यात अधिक भर पडली आहे. कारण सरकारने उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती वाढवल्या. त्यामुळे सीएनजी पीएनजी दरांत वाढ झाली असून आजपासून महानगरकडून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे.पीएनजी दरांत प्रतिकिलो 1 रूपये दरवाढ तर सीएनजी प्रतिकिलो 2 रूपये दरवाढ करण्यात आली आहे.

नॅचरल गॅसच्या किंमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅसने सीएनजी पीएनजी दरात वाढ केली आहे. (CNG, PNG prices to rise sharply as gas price increased by 62%) सीएनजीच्या दरांत एक रूपयाने तर पीएनजीच्या दरात दोन रूपयांनी वाढ करण्यात आली आहे.

अधिक वाचा  भारत - दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून आली मोठी अपडेट

ही दरवाढ आजपासून लागू झाली. वाहनांसाठी सीएनजी वापरला जातो. तर घरगुती वापरासाठी पीएनजी पाईपच्या माध्यमातून पुरवला जात आहे. त्यामुळे या दरवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.