बावधन : बावधन बुद्रुकचे उपसरपंच दीपक दगडे पाटील यांच्या पुढाकारातून बावधन बु व सुतारवाडी परिसरातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी
जिल्हा परिषद सदस्य शुक्राचार्य वांजळे, नगरसेवक दीपक मानकर, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, बाबा धुमाळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीप दगडे, तानाजी दगडे, मा.नगरसेवक प्रमोद निम्हण, बालम सुतार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकरी,ग्रामपंचायत पदाधिकारी व परिसरातील
नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा  भारत- रशिया ५१०० कोटींचा सौदा; एके-२०३ रायफल्सचा UPमध्ये सुरु करणार कारखाना

कोरोनामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न संपूर्ण देशभर निर्माण झाला आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्यास या रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णवाहिकेमुळे सुतारवाडी व बावधन परिसरातील आरोग्यसेवा अधिक बळकट आणि सुकर होण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच रुग्णसेवेचे व्रत अविरतपणे सुरू राहील अशी प्रतिक्रिया बावधन बुद्रुकचे उपसरपंच दीपक दगडे पाटील यांनी दिली.