आयपीएल २०२१ स्पर्धेत बंगळुरुने प्लेऑफमधलं स्थान निश्चित केलं आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा बंगळुरू तिसरा संघ आहे. बंगळुरूने पंजाबवर ६ धावांनी विजय मिळवला आहे. बंगळुरूने पंजाबला विजयासाठी १६५ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबचा संघ २० षटकात ६ गडी गमवून १५८ धावाच करू शकला. या पराभवासह पंजाबचा प्लेऑफमधील मार्ग जवळपास बंद झाला आहे. पंजाबचा साखळी फेरीतील शेवटचा सामना आता चेन्नई सुपर किंग्स सोबत आहे. पंजाबचा संघ पराभूत झाल्याने मुंबईच्या प्लेऑफमधील आशा कायम आहेत.

पंजाबचा डाव

पहिल्या गड्यासाठी कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पंजाबला केएल राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलनं त्याचा झेल घेतला. केएल राहुलने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. यात २ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. निकोलस पूरन मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. त्याने ७ चेंडूत ३ धावा केल्या. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कल याने त्याचा झेल घेतला.मयंक अग्रवालच्या रुपाने पंजाबला तिसरा धक्का बसला. त्याने ४२ चेंडूत ५७ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आमि २ षटकारांचा समावेश आहे. मयंक पाठोपाठ सरफराजही तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. मारक्रम बाद झाल्याने पंजाबवरील दडपण वाढलं. जॉर्ज गॉर्टनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला. डॅन ख्रिश्चियन झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर शाहरूख खान धावचीत झाल्याने पंजाबच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. हेनरिकने सामना जिंकवण्यासाठी धडपड केली. मात्र त्याला अपयश आलं.

अधिक वाचा  Railway Recruitment 2021: विविध पदांसाठी होणार भरती,काय आहे तपशील, जाणून घ्या

बंगळुरूचा डाव

विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. पहिल्या पाच षटकात बंगळुरूचा फलंदाज बाद करण्यात पंजाबला अपयश आलं. बंगळुरूला विराट कोहलीच्या रुपाने पहिला धक्का बसला. विराट मोइसेसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २४ चेंडूत २५ धावा केल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. विराट पाठोपाठ डॅन ख्रिश्चियनही दुसऱ्या चेंडूवर बाद होत तंबूत परतला. डॅनला आपलं खातंही खोलता आलं नाही. देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे जीवदान मिळालं होतं. त्यामुळे पंजाबचा कर्णधार केएल राहुल नाराज झाला होता. कारण गडी बाद तर झालाच नाही. उलट खिशातला एक रिव्ह्यूही वाया गेला. या संधीचा फायदा घेऊन पडिक्कल मोठी धावसंख्या करेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा होती. मात्र हेनरिचच्या गोलंदाजीवर पडिक्कल ४० धावा करून बाद झाला. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी चौथ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाचा समावेश आहे. मॅक्सवेलने २९ चेंडूत ५० धावा केल्या. ही जोडी जमली असतानाचा एबी डिव्हिलियर्स धावचीत झाला. सरफराज खानने थेट स्टम्पवर चेंडू फेकत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. एबी डिव्हिलियर्सने १८ चेंडूत २३ धावा केल्या. यात एक चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने तीन गडी बाद केले. ग्लेन मॅक्सवेल ३२ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. मॅक्सवेल तंबूत परतत नाही. तोच एक चेंडू खेळत शाहबाज अहमद शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला जॉर्ज गार्टन खातंही खोलू शकला नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात कोणताही बदल केला नाही. तर पंजाब किंग्स संघात तीन बदल करण्यात आले होते. हरप्रीत ब्रार, सरफराज खान आणि मोईसेस हेनरिक यांना संघात स्थान दिलं होतं.

प्लेईंग इलेव्हन

बंगळुरू-

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाद अहमद, डेनियल ख्रिस्टियन, जॉर्ज गॉर्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

पंजाब-

केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल. एडन मार्कम, निकोलस पूरन, शाहरूख खान, सरफराज खान, मोइसेस हेनरिक, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवि बिष्णोई