मेरठ : लखीमपुर खीरीत आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी रात्री प्रियंका गांधी लखनऊ मध्ये पोहोचल्या. त्यानंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्या लखीमपुरमध्ये गेल्या असताना त्यांना पोलिसांनी अडवले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीटिंग घेऊन आदेश दिले की, विरोधी पक्षातील कोणताही नेता लखीमपुर-खीरी मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना अटक करण्यात यावी या आदेशानंतर राजकीय नेत्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, खूप महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहे तरीही सरकार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.सुरवातीपासून शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांना संपून टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज दाबण्याच राजकारण करत आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे.

अधिक वाचा  पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का नाही? - अमोल कोल्हे

हा देश भाजपच्या विचारधारेवर चालणारा देश नाही. या देशाला शेतकऱ्यांनी बनवल आहे. प्रियंका गांधी पुढे म्हणाले की जेव्हा सरकार आणि पोलीस शक्तीचा वापर करत असते तेव्हा त्यांची नैतिकता संपलेली असते. मी माझ्या घरातून बाहेर पडून कोणताही अपराध करणार नाही. मी फक्त मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात आहे.

लखीमपुर मध्ये झालेल्या हिंसाचारात बद्दल बोलतानाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकार या घटनेच्या मुळापर्यंत जाईल. त्यांनी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिलेला आहे.