मुंबई – खोल समुद्रात सुरू असणाऱ्या जहाजावर सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता शहारूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेथून कोकेन, मेफेड्रोन आणि इत्स्कासी सारख्या अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. हे सगळ होत असताना सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये मात्र उद्योगपती गौतम अदानी आले आहेत.

नेटकरी या प्रकरणाचा संबंध आता देशातील उद्योगपती गौतम अदानींशी जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. गौतम अदानींच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून काही दिवसांपूर्वी एनसीबीने तब्बल ३ हजार किलो वजनाचा ड्रग्ज साठा हस्तगत केला होता. यावरुन नेटीजन्सनी मुंबईत येणारा ड्रग्ज साठा अदानींच्या मालकीच्या पोर्टवरून आला का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

अधिक वाचा  देशात १२७.६१ कोटी लसमात्रा; निम्म्याहून अधिक प्रौढांचे लसीकरण

एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर कारवाई करत ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स आणि १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले.पण अदानींच्या मालकीच्या गुजरात पोर्टवर अफगाणिस्तानातून आलेल्या तीन हजार किलोचा ड्रग्ज साठा जप्त केल्यानंतर त्याचं पुढं काय झालं याविषयी कोणीच काही का बोलत नाही, असा सवाल करण्यात येतोय. एकंदरीतच आर्यन खानऐवजी आता गौतम अदानी सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.