कर्वेनगर वारजे येथे साकारण्यात आलेल्या आरोग्य सेवा कोठी कार्यालय, आधार कार्ड केंद्र, शाहू कॉलनी ज्येष्ठ नागरिक कट्टा – कै. वसंत सदाशिव बगाडे वाचनालय यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पुणे मनपाच्या नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांच्या विकासनिधीतून व श्री. स्वप्नील दुधाने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमांचा उद्घाटन सोहळा प्रभागातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक मा. श्री. विठ्ठलराव शेवाळे काका, खेळाडू व योग प्रशिक्षक श्री. जितेंद्र शहा व संत साहित्याचे अभ्यासक मा. डॉ. श्री. भालचंद्र कापरेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

नागरिकांची सोयीकरिता, महापालिकेचे सफाई कर्मचारी – कचरावेचक बांधव यांच्यासाठी कार्यालयाची आवश्यकता लक्षात घेऊन आरोग्य सेवा कोठी उभारण्यात आली. नागरिकांची आधार कार्डसंबंधी कायमस्वरूपी सोय होण्यासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेऊन आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आले. तर शाहू कॉलनीतील नागरिकांच्या मागणीला मान देत त्याठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा व वाचनालय साकारले. याप्रसंगी आरोग्य सेवा कोठीचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या श्री. प्रतिक फुंड व श्री. अनिल राठोड, आधार कार्ड केंद्राचे प्रमुख श्री. कुंबरे सर, ज्येष्ठ नागरिक कट्टा विकसित करणारे श्री. समीर साठे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक

याचसोबत स्वच्छता दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग असणाऱ्या घेणार्या पुणे मनपाचे सफाईसेवक श्री. प्रसाद गायकवाड, श्री. सागर राजगुरू, श्री. नामदेव जेटीथोर, नंदा गोरखे व सामाजिक कार्यकर्ते श्री. रवी बगाडे व जाधव सर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अमृत कलक्ष सोसायटीचे माजी चेअरमन श्री चंद्रकांत खैरे, नंदिनी बगाडे ताई, प्रमोद शिंदे, किशोर शेडगे, अंजिक्य दुधाने व प्रभागातील विविध सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून शोभा वाढवली. या उपक्रमांचा नागरिकांना चांगला फायदा होईल असा विश्वास वाटतो. कार्यक्रमाचे सुत्र संचालन जयश्री धुपकर व आभार किशोर शेडगे यांनी मानले.