पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून भ्रष्टाचारासाठी आसुसलेले आणि सभ्यता सोडलेले लोकप्रतिनिधी मोकाट सुटले असून या वाचाळवीरांना आळा घालण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त कुमार यांनी व्यक्तीच्या लक्ष घालून त्वरित कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपालीताई धुमाळ यांनी केली आहे.

सभ्यतेचा बुरखा घालून या पक्षाच्या वतीने पुणेकर नागरिकांची दिशाभूल करत पुणे महापालिकेची सत्ता मिळवली परंतु या पाशवी बहुमताच्या भारतीय जनता पक्षाला अहंकाराला असून यांना अधिकारी महिला यांच्या विषयी सभ्यता राहिली नाही.

सध्या समाज माध्यमांमध्ये फिरत असलेल्या ऑडिओ क्लिप मधून पुन्हा भारतीय जनता पक्षाची संस्कृती दिसली आहे. महिला अधिकाऱ्यांशी अशा भाषेत बोलणे योग्य नाहीच, भाजप कडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. यापूर्वी भाजपच्या महिला नगरसेविकेच्या पतीची अशाच प्रकारे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ठेकेदारासाठी महिलांना शिवीगाळ करणारे भाजपचे पदाधिकारी जनतेच्या हितासाठी काही करत नाहीत.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

या अगोदर सुध्दा कोरोनाच्या कालात महिला आरोग्य अधिकारी यांना एका भाजप नगरसेवकाने अश्लील शिवीगाळ दिली होती. त्याप्रमाणे राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेत्याने महिला कलावंताविषयी असभ्य भाषा वापरली होती. अशी अनेक उदाहरणे देता येतील परंतु भाजपाच्या पदाधिकाऱ्यां मध्ये कुठलीही सुधारणा होत नाही ही भाजपची संस्कृतीच आहे भाजप च्या विचारांचा निषेध व्यक्त करत दिपाली प्रदीप धुमाळ विरोधी पक्षनेत्या यांनी पुणे मनपा यांना त्वरित कारवाई करून निलंबित करण्याची मागणी केली आहे.