सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील व कर्वेनगर परिसरातील रहिवासी शारीरिक शिक्षण संचालिका प्राध्यापक विद्या पाठारे हनवंते यांची नुकतीच पीएचडी व्हायवा झाली. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातून “राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंचा कार्यमानाचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर पीएचडी केली. त्याबद्दल नगरसेविका सौ लक्ष्मीताई दुधाने व उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस स्वप्निल दुधाने आणि एम एच स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. विद्या पाठारे यांची ऑनलाईन मौखिक परीक्षा २४ सप्टेंबर रोजी झाली. या मौखिक परीक्षेसाठी बहिस्थ प्रशिक्षक म्हणून एलएनआयपी शारीरिक शिक्षण अभिमत विद्यापीठ ग्वाल्हेरचे प्राध्यापक डॉ. आशिष पुलकर हे उपस्थित होते. चेअरमन म्हणून पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. दीपक माने हे उपस्थित होते.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? फडणवीसांचे पहिल्यांदाच सविस्तर उत्तर

डॉ. विद्या पाठारे या पुणे विद्यापीठाच्या माजी खेळाडू असून तसेच राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहेत. त्यांनी ‘ राष्ट्रीय महिला खेळाडूंच्या क्रीडा कार्यमानाचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर त्यांनी आपला प्रबंध सादर केला होता. त्यांनी तयार केलेली पदनिश्चय श्रेणी ही कबड्डी खेळातील संघ निवडीसाठी उपयुक्त ठरणार असून यापूर्वी या खेळावर असे कोणतेही संशोधन झालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी सादर केलेले संशोधन हे जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळासाठी नवी दिशा देण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे त्यांनी केलेले संशोधन हे त्या महाराष्ट्र कबड्डी महासंघाला सादर करणार आहेत. त्यांनी त्यांच्या खेळाडू कारकिर्दीत पुणे विद्यापीठाला अनेक विजेतेपद प्राप्त करून दिलेली आहेत. त्यांच्या त्या अनुभवाचा फायदा त्यांना त्याने संशोधन पूर्ण करण्यासाठी झाला आहे.

अधिक वाचा  कर्नाटकात ओमिक्रॉन : 2 आठवडे भारताला महत्त्वाचे- आरोग्य तज्ज्ञ

डॉ. विद्या पाठारे या महाराष्ट्रातील नामवंत पुणे येथील कबड्डी क्लब ‘सुवर्णयुग कबड्डी’ संघाच्या माजी खेळाडू असून त्यांना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक अनंत शेळके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कबड्डी क्षेत्रासाठी आपले योगदान देत आहेत. त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथून पूर्ण केले असून बीपीएड व एमपीएड पुण्यातील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथून पूर्ण केले आहे. त्यांचे पीएचडीची डिग्री सुद्धा याच महाविद्यालयातील संशोधन केंद्रातून पूर्ण केली आहे.

या पीएचडी अभ्यासामध्ये त्यांना कुटुंबातील सर्व व्यक्तींनी खूप सहकार्य केले व पाठिंबा दिला. आपण मिळविलेल्या ऊत्तुंग यशाबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना सौ लक्ष्मीताई दुधाने व स्वप्नील दुधाणे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांना हे संशोधन पूर्ण करण्यासाठी चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे डॉ. शरद आहेर व प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकारी, महाविद्यालयीन परिवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, सहसंचालक डॉ. दत्ता महादम, प्राचार्य डॉ. सोपान कांगणे आणि इतर सर्वानी अभिनंदन करून त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.