जळगाव: केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना जेरीस आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर सातत्यानं केला जातो. यावर बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी परिषदेत तुफान टोलेबाजी केली. भीती वाटत असेल, तर भाजपमध्ये जा, असा उपरोधिक सल्ला भुजबळांनी देताच सभागृहात हशा पिकला.

ओबीसी परिषदेत ओबीसी नेत्यांनी आक्रमक भाषणं केल्यानंतर भुजबळांनी तुफान टोलेबाजी केली. ‘इथे सगळे विविध विषयांवर जोरजोरात बोलले. चर्चा केली. पण सावध राहा बाबा. उद्या घरी आयकर विभागवाले आले नाही म्हणजे झालं. जो जो या कामात येईल, त्याला बरोबर ऊस चरख्यात टाकून रस काढला जातो, तसं काढतात. आता सध्या खडसे साहेबांच्या पाठीमागे लागले आहेत,’ अशा शब्दांत भुजबळांनी भाजपवर निशाणा साधला.

अधिक वाचा  अनिल अंबानी अडचणीत? रिझर्व बँकेने सुरू केली कायदेशीर प्रक्रिया

कपिल पाटील यांचे जाहीर आभार

यावेळी छगन भुजबळांनी तुरुंगातील दिवसांची आठवण सांगितली. आमदार कपिल पाटील यांचे भुजबळ यांनी जाहीर आभार मानले. ‘मी तुरुंगात असताना कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला. मी जेव्हा तुरुंगात टाकलं, तेव्हा एकदा प्रकृती फार बिघडली होती. तुरुंगात सोपी गोष्ट असते. कुणाातरी तुरुंगात टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. संपला विषय. पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले.

अधिक वाचा  ममतांचा मुंबई दौरा: मविआत धुसफूस, तर भाजपला पोषक; राजकारण वेगळ्या वळणावर?

तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना? हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं की भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो,’ अशी आठवण सांगत भुजबळांनी पाटील यांचे आभार मानले.