वारजे येथिल राजयोग प्रतिष्ठान व श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळाच्या वतीने राजयोग सोसायटी मधील श्री गणेश मंदिर मध्ये गेल्या चार महिन्यांपासून ह भ प धर्मराज महाराज हांडे यांच्या प्रयत्नातून राजयोग सोसायटी व परिसरातील लहान मुलामुलीं साठी हरिपाठ चे संस्कार वर्ग सुरू केले आहे .

रोज सायंकाळी साडे सहा ते साडे आठ या वेळेत या वारकरी संप्रदायातील संगीत हरिपाठ चे सुरू आहेत. यामध्ये मुलांची संख्या जास्त असल्याने मुलांची व मुलींची स्वतंत्र दोन बॅच मध्ये वर्ग सुरू आहेत. मुलांची शाळा बंद असल्याने मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडावेत व या वयापासूनच या मुलांना वारकरी संप्रदाय व भजन किर्तन प्रवचन व संतांची माहीती व्हायला पाहिजे.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

35 वर्षे मंदिरात दर शनिवार, चतुर्थी; प्रत्येक एकादशी ला हांडे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भजन किर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम होत आहे याचाच एक भाग म्हणून ही परंपरा यापुढेही अशीच चालु रहावी म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. याचबरोबर या जवळपास 80 मुलामुलींचे ज्या दिवशी वाढदिवस असेल त्यादिवशी त्या मुला- मुलीचा केक कापुन वाढदिवस साजरा केला जातो. या उपक्रमासाठी ह.भ.प धर्मराज महाराज हांडे व राजयोग भजनी मंडळाचे सर्व सदस्य रोज आपला वेळ देत आहेत.

यासंस्कारातुन या मुलांमधुन चांगले गायक, तबला-पखवाज वादक व हार्मोनियम वादक निर्माण व्हावेत असा उद्देश समोर ठेवुन हा उपक्रम राबवित आहोत अशी माहिती मा नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी दिली.