राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. आपल्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून विकासाकामांचा आलेख सर्वसमावेशक नागरिकांच्या उत्क्रांती अहोरात्र झटणारा आणि त्याच बरोबर सर्वसामान्य घरातील अनेकांना मुख्य राजकीय प्रवाहात आणून भाजपा ओबीसी प्रदेशध्यक्ष तथा माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा वारसा आपल्या कृतीतून अनेकजण पुढे चालवत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबातील युवा आणि महिलां वर्गाचा समावेश आहे.

भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षा सविता प्रकाश हिंगणे यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोना यांसारख्या संकटात त्या जनतेच्या मदतीला धावून गेल्या. महिला आणि व्यापारी विकासाच्या नवनव्या संकल्पना त्या प्रामुख्याने मांडत आहेत. सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम त्यांचे मार्गदर्शक मा. आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली त्या कार्य करतात. भाजपा कार्यकर्ती ते भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षा अशी गरुडझेप घेणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला नेतृत्वाचा आज वाढदिवस…

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

केवळ हडपसर नव्हे तर राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या योगेश अण्णा टिळेकर यांच्या उक्ती आणि कृतीचा वारसा पुढे चालवत सविता हिंगणे यांनी वेगळा नावलौकिक जपला आहे. तसे सामाजिक कार्यातून राजकारण, समाजकारण करण्यासाठी त्या नेहमीच कटिबद्ध आहेत.विविध उपक्रमांनी गतिमान समाजपरिवर्तन हे ब्रीद घेऊन त्या काम करीत आहेत. कौटुंबिक डोलारा सांभाळतानाच त्यांनी महिलांच्या विविध सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. एक मुलगी,महिला काय करू शकते ? याचा वेगळा आलेख आपल्या कामातून त्या राबवत जनजागृती करत असतात. केंद्र – राज्य आणि स्थानिक पातळीवर असणाऱ्या विविध योजना जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना शासनस्तरावरून मदत व्हावी यासाठी सतत कार्यरत असतात.त्यांचे सर्व स्तरावर असणाऱ्या कार्याची दखल घेऊन सद्यस्थितीत हडपसर विधानसभा क्षेत्रांतर्गत व्यापारी,महिला वर्गाला आणि युवकांना पक्षासोबत जोडण्याचे काम करत आहेत. राजकीय दृष्ट्या संवेदनशील महिला कार्यकर्ती आणि सर्वसमावेशक महिला नेता कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ सामाजिक कार्यातून त्या आपल्या हडपसर परिसरात घालून देत आहेत.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नांवर त्यांचे बारीक लक्ष असते. हडपसर व परिसरातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या नेहमीच अग्रेसर काम करीत असतात. कोरोनाच्या संकटातही त्या लोकांच्या मदतीला धावल्या. आपल्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न होते. त्याला बऱ्याच अंशी यशही आले.

कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम योगेश अण्णा टिळेकर यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत.त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे. त्यांच्या मुशीतून तयार झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत.जनतेच्या कसोटीवरही त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता यशस्वी ठरो आणि सविता हिंगणे यांच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय वारसा खऱ्या अर्थाने नेतृत्व करो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा…