पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली अटल आरोग्य रथ यात्रा हेवली तालुक्यातील फुरसुंगी गावात आली. यावेळी फुरसुंगी गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन के डी बापू कांचन यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती दिनकर बापू हरपळे, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष केशव कामठे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप बापू हरपळे, तालुकाध्यक्ष धनंजय अप्पा कामठे, ह. भ. प बाळू तात्या हरपळे, पांडुरंग शेवाळे, युवा मोर्चा माजी अध्यक्ष रणजित रासकर, उपाध्यक्ष पप्पू जाधव, सोशल मीडिया प्रमुख सुजित मोडक, महिला अध्यक्ष वैशाली पवार, जनसेवक राजेंद्र भिंताडे, विशालनाना हरपले, तानाजी कामठे, संदीप परदेशी, अभिजित खराडे, दादा कड, ओमकार होले, राजेंद्र शेवाळे, राजेंद्र पवार, अक्षय कामठे, विजय कानकाटे, राज कामठे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

सूत्रसंचालन धनंजय कामठे यांनी केले.आभार संदीप बापू हरपळे यांनी मानले.