मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडेने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तावडे जून 2016 पासून अटकेत आहे.

तावडेने केलेल्या जामीन अर्जावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले. त्याच्यासह अन्य तिनजणांवर यूएपीए, हत्या इ आरोप सीबीआय ने ठेवले आहेत. पुणे न्यायालयाने तावडेचा जामीन नामंजूर केला आहे. या निर्णयाला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गौरी लंकेश हत्येतील आरोपीच्या जबाबाचा माझाशी संबंध लागू शकत नाही असा दावा त्याने केला आहे.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

दाभोलकर हत्येचा सूत्रधार तावडे असून अंधश्रद्धा विरोधात मोहीम चालविणाऱ्याना दहशत बसविण्यासाठी हत्या घडविली असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. दाभोलकर यांची पुण्यात ता 20 औगस्ट 2013 रोजी सकाळच्या वेळी दोन बाईकस्वारांनी हत्या केली होती. उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयला सोपविला आहे.