पुणे – राज्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली. राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडतील.

सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण-पूर्व झारखंड व परिसरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर पुढील ४८ तासांमध्ये त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून पुढील तीन दिवस अशीच कायम राहणार आहे.

अधिक वाचा  Rakhi sawant: 'माझ्या बॉडीचा हा पार्ट खोटा'; 16 लाख किंमत

विदर्भात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुधवारी (ता. २१) कोकणातील सर्वच जिल्हे, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारपासून (ता. २४) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडतील असे हवामान विभागाने सांगितले आहे.