पुणे : पुण्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मुळशी धरणाचे 5 TMC पाणी पुणे शहराला मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, वीजच्या बदल्यात टाटा कंपनी 5 TMC पाणी देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे पाच टीएमसी पाणी पुणे शहराला मिळण्याबाबत हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. मुळशी धरण हे टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यातून वीज निर्मिती होते. पाच टीएमसी पाण्याच्या बदल्यात त्यातून निर्मित होणारी तितकीच वीज सरकार कडून टाटा कंपनीला दिली जाईल असा प्रस्ताव आहे.

अधिक वाचा  लोकशाही झुंडशाहीला आवर न घातल्यास संपेल!; निवृत्त न्यायमूर्ती चपळगावकर

पुणे शहराची लोकसंख्या वाढली आहे. शहरालगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहराला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.