पुणे : शहरातील मुख्य वसाहत असलेल्या कर्वेनगर व सनसिटी सिहंगड रोडला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर दुधाने परिवार यांच्या तत्परतेमुळे मार्गी लागला आहे. या पुलासाठी लागणारी तब्बल 12 गुंठे जागा आज मनपाला प्राथमिक ताबेयादी करुण पुढील प्रक्रिया करण्याकरिता परवानगी दिली. पुणे मनपा शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि दुधाने परिवार यांची आज मनपा कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत दुधाने परिवाराने पुन्हा एकदा कर्वेनगरच्या विकासाला प्रथम प्रधान्य देत जमीन देण्याचा निर्णय घेतला.

दुधाने परिवाराची यापुर्वी शिवणे ते खराडी या डीपी रोडकरिता कर्वेनगर मधीलच स्वता:च्या मालकीची (३० मीटर व १२ मीटर डीपी रस्त्यासाठी) ४ एकर जागा पुणे महापालिकेला त्यांनी दिली आहे व जागेवर रस्ताही पुर्ण झाला आहे. तसेच दुधाने परिवाराच्या इतर जागेत पुणे महापालिकेने आतापर्यंत प्रायमरी स्कुलसाठी ४० गुंठे, लायब्ररीसाठी ८ गुंठे, हॉस्पिटलसाठी १२ गुंठे, ग्रीन बेल्टसाठी ८५ गुंठे आरक्षण टाकले आहे. अगोदर एवढी जमीन जाऊनही परत आता कर्वेनगर ते सनसिटी-सिंहगड रोड परिसराला जोडणाऱ्या पुलासाठी जागा दुधाने परिवाराने दिली आहे.

अधिक वाचा  सरु आजीने डॉक्टराला दिली धमकी -‘देवमाणूस2'

कर्वेनगर ते सनसिटी-सिंहगड रोड ते या दोन्ही उपनगरांना येण्या-जाण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी लागत आहे, तो या नदीवरील पुलामुळे पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये जाणे-येणे होईल, इतकी जवळून ही दोन्ही उपनगरे जोडली जाणार आहेत. तसेच कर्वेनगर व सिंहगड रोड-सनसिटी परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍नही सुटेल. 

आज दि २० संप्टेबर रोजी महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये प्रशांत वाघमारे साहेब यांच्या ऑफिस मध्ये संपूर्ण दुधाने परिवाराचे सदस्य उपस्थित राहून मा. प्रशांत वाघमारे साहेबांना या बारा गुंठ्याच्या बाधित क्षेत्राची प्राथमिक ताबे यादी देऊन पुलाच्या कामाला हिरवा कंदील दिला, त्याबद्दल सर्व दुधाने परिवाराचे महानगपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. तसेच, या पुलाच्या संदर्भात वेळोवेळी मा. प्रशांत वाघमारे साहेब यांनी परिवाराशी सतत सकारात्मक चर्चा करून हा विषय मार्गी लावला त्याबद्दल दुधाने परिवारातर्फे मा. प्रशांतजी वाघमारे साहेबांचा सत्कार ही या ठिकाणी करण्यात आला.

अधिक वाचा  भारत - दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून आली मोठी अपडेट

आज प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शेतकरी यांच्या योग्य संवादामुळे कर्वेनगर वारजे आणि सनसिटी सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला. यावेळी दुधाने परिवारातील कुटुंब प्रमुख कोंडीराम दुधाने, माणिकशेठ दुधाने, विजय दुधाने, स्वप्निल दुधाने उपस्थित होते.