मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता त्यांनी किरीट सोमय्या प्रकरणी मुंबईला गेल्यानंतर ह्याची माहिती घेऊन सांगेन असे ते म्हणाले. पुण्यातील बालेवाडी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

मला याबद्दल काहीच माहिती नाही मी विकास कामाला महत्त्व देतो आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो आणि विकास कामाला महत्त्व देतो लोकांच्या कामाला आणि अडीअडचणीला महत्त्व देतो. लोकांचे लक्ष वेगळ्या कारणाने दुसरीकडून डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न काय आहेत ते पहा. कोरोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो. हा कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला आहे या प्रकरणी माहिती घेतो त्यानंतर मी प्रतिक्रिया देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

काय म्हणाले अजित पवार?

मुंबईनंतर पिंपरी चिंचवड आणि पुणे वाढत असताना समाविष्ट गावाला सुविधा मिळाल्या पाहिजेत. सार्वजनिक कामाला आणि मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न करतो. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून म्हाडाच्या घराची सोडत काढली आहे. काहींना घर घ्यायला परवडत नाही म्हणून ही सुविधा केल्याचे ते म्हणाले. तसेच पिण्याच्या पाण्याची अडचण ही गोष्ट खरी आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता ही अडचण येत आहे. त्यामुळे शेतीचं पाणी हिकडं वळवायला लागत आहे. यामुळे शेतीला देखील अडचण येत आहे.

मुळशी धरणातील 1 टीएमी पाणी मुळा नदीत सोडण्याचा निर्णय घेतला, हे सर्व होत असताना समन्वय महत्वाचा असल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले. मलाही खात्री आहे 100% काम होत नाही. ओळख कमी असेल की ती काम होत नाहीत. पण प्रयत्न करत रहायचे. चर्चेतून चांगले मार्ग निघतात जर चर्चा नाही केली तर मार्ग निघत नाही, असे ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा  सचिन वाझे-परमबीर सिंह भेट; देशमुख यांच्या वकीलांची नाराजी

महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार आणि आम्ही प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे, काही जण झोपेत असतील तेव्हा माझं काम सुरू असतं. आम्ही शेतकरी वर्गातील आहोत, त्यामुळे शेतीला वापसा मिळाला पाहिजे. सोशल मिडियामुळे सगळे जवळ आलेत त्यातील चांगलं घ्या वाईट मार्गाला जाऊ नका.

शाळेसाठी 65 हजार कोटींचा निधी

शाळेसाठी 65 हजार कोटींचा निधी देत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले. खाजगी आणि शासकीय शाळांमध्ये मोठी तफावत आहे. कुठलाही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्नशील असून शाळेसाठी 65 हजार कोटी शाळेसाठी निधी देत आहोत, असे पवार म्हणाले.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

दुसऱ्यांदा कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने गणपती उत्सव साजरा केला. असल्या कार्यक्रमावर बंदी आणायला मुख्यमंत्री आणि आम्हाला पण बरं वाटत नाही. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचं काम सुरू आहे. तिकडं पिंपरी चिंचवडमधील निगडीपर्यंत घेऊन जाण्याचा काम सुरू आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.