पुणे: सार्वजनिक गणेशोत्सवाचे शहर म्हणून नावारूपाला आलेल्या पुण्यामध्ये आज सकाळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुणेकर नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन आणि गणेशोत्सवातील उत्साह या दोन या दोन्ही गोष्टींचा संगम साधत आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले. पुण्यातील गणेशोत्सवाच्या दरम्यान कोरोना प्रसार न होण्यासाठी पुण्यातील पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने अत्यंत काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता; परंतु या कडक नियमावलीला विरोध न करता पुण्यातील गणेश उत्सव उत्सव मंडळाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्व नियमाचे पालन करत आपल्या गणेश उत्सवाचे पवित्र राखण्याचे ही काम केले.

गणेश उत्सवाच्या दरम्यान विविध प्रकारचे सामाजिक आणि प्रासंगिक संदेश देण्याची परंपरा कोरोना काळातही कायम राखत पुणेकर नागरिकांनी आपल्या उत्सवाचे वेगळेपण जपले. यामध्ये काही लोकांनी कोरोना नियमाचे करण्याचे आवाहन केले तर काहींनी विविध प्रकारच्या रांगोळ्या मधून आपले सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

पुण्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या वतीनेही या गणेशोत्सवाच्या काळामध्ये नागरिकांना कायमच गर्दी न करण्याचे आव्हान केले. त्याबरोबरच करण्याचे नियमाचे पालन करण्याचे आवाहन करत एक चांगला उपक्रम पूर्ण केला.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टच्या वतीने आज पुणेकर नागरिकांसाठी दैनंदिन वृत्तपत्रांच्या माध्यमातून ‘श्रीं’ चा गंधरुपी प्रसाद घरोघरी पाठविण्यात आल्याने एक वेगळी पहाट पुणेकर नागरिकांना पाहण्यास मिळाली. तर विसर्जन नियोजनामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टच्या वतीने Online education या सामाजिक विषयाला हात घालत शाळा सुरू करण्याची चिमुकल्यांची साद रांगोळीतून साकारली आहे.

मानाचे गणपती उत्सव

ग्रामदैवत कसबा-
मानाचा पहिला गणपती म्हणून ग्रामदैवत कसबा गणपती याकडे पाहिले जाते या गणपतीची विसर्जन मिरवणूक झाल्याशिवाय अन्य शहरातील कोणत्याही गणेश उत्सव मंडळाची विसर्जन होत नसल्याने या गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जनाने पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन सुरू करण्यात आले. ग्रामदैवत कसबा यांच्यावतीने श्रींना निरोप देण्यासाठी सभामंडपातच सुरेख अशा फुलांनी सजवलेल्या जाग्यावरती विसर्जना चे नियोजन केले होते. पुष्पमाला मी घडवलेल्या हौदाला मध्ये ग्रामदैवत कसबा येथील प्रतिष्ठापित श्रींच्या मूर्तीला विसर्जित करण्यात आल्यानंतर त्याच्यावरती फुलांच्या आच्छादन घालून श्रींना मनोभावे निरोप देण्यात आला.

देवता तांबडी जोगेश्वरी –

पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाच्यावतीने सभामंडपाच्या बाहेरच आकर्षक अशा पाण्याच्या हौदामध्ये मानाच्या दुसरे गणपतीला विसर्जित करून निरोप दिला. Corona च्या काळातील नियमांचे पालन करण्यासाठी कोणत्याही मोठ्या स्वरूपाचे आयोजन न करता अत्यंत भावनिक वातावरणात श्रींना विसर्जित करण्यात आले.उत्सव काळामध्ये केलेली आरास, सजावट आणि विसर्जन नियोजनाचे केलेले सुयोग्य नियोजन यामुळे ग्राम देवता तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या श्री मूर्तचे विसर्जन करण्यात आले.

अधिक वाचा  ममतांचा मुंबई दौरा: मविआत धुसफूस, तर भाजपला पोषक; राजकारण वेगळ्या वळणावर?

गुरुजी तालीम मंडळ-

पुण्याचा मानाचा गणपती म्हणून ज्या गणपतीची ओळख केली जाते आणि ज्या गणेशोत्सव मंडळांमध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मिळाली अशा गुरुजी तालीम मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव वही मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कोरोणाच्या बदलेल्या नियमाचे पालन करत अनु उत्साही वातावरणात पुण्याचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.

तुळशीबाग सार्वजनिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या विसर्जना मध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता उत्साही वातावरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला.

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-

मानाचा चौथा गणपती म्हणून तुळशीबाग गणपती उत्सव मंडळाची ओळख असल्याने कुरूना काळातही नियमांचे पालन करत मानानुसारतुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने चौथ्या क्रमांकावर आपल्या श्री चे विसर्जन करण्याचा महोत्सव सुरू केला. यानंतर फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये श्रीं ची मूर्ती विराजमान झाली आणि मुख्य लक्ष्मी रस्त्यापर्यंत मिरवणूक काढून पुन्हा सभामंडपामध्ये आरती करण्यात आली.

अधिक वाचा  प्रियांका चतुर्वेदी यांनी निलंबनाच्या निषेधार्थ सोडले अँकरिंग

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री विसर्जनासाठी आकर्षक अशा गजमुखी हौदाची निर्मिती करण्यात आली होती. कोरोना काळातही गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उत्साह कमी न करता नव्या नियमाप्रमाणे आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी अनोख्या प्रकारचे नियोजन केले होते.

केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव-

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची विसर्जनाची विधी पूर्ण झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता, पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सार्वजनिक रित्या आपल्या बाप्पाला निरोप दिला.

पुणे शहरातही विविध ठिकाणी उत्साहात श्रींचे विसर्जन-

पुणे महापालिकेच्या वतीने पूर्ण शहरभर विसर्जन हौद यांची सोय करण्यात आली होती. पुण्यातील विविध पेठा आणि उपनगरे कोथरूड, वारजे, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी, बाणेर, बालेवाडी, औंध यासह संपूर्ण शहरभर गणेशोत्सवाचे आनंदमय वातावरण पाहण्यास मिळाले.

असली तरीही आपल्या घरातील गणपतीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी अनेक नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या वतीने केलेल्या व्यवस्था व अनेक मनपा इच्छुकांच्या विसर्जन हौद यांचा लाभ घेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.