पतित पावन संघटने तर्फे नगर जिल्हा तसेच मावळ तालुका आणि शिरूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अंकुश रमेश जेधे यांची आज पतित पावन संघटनेच्या नगर जिल्हा अध्यक्ष पदी तसेच निखिल मच्छिद्रनाथ केदारी यांची मावळ तालुका अध्यक्ष आणि शंकर विठ्ठल झंजाड (पाटील) यांची शिरूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,तसे पत्र आज त्यांना ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव चव्हाण, प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील प्रांत संघटक सिताराम खाडे,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजीव सलगर पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, शहर पालक मनोज नायर,जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास मणेरे यांचे हस्ते देण्यात आले.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

या प्रसंगी सर्व युवकांना योग्य दिशा देण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रथे प्रमाणे अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभे राहण्यासाठी आज पासून सुरवात करावी असे सांगितले.

संघटने च्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना एकत्र करून एक नवा व विधायक असा युवा हिंदू पॅटर्न उभा करण्यासाठी जोमाने प्रयत्न करत राहू असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी संघटनेचे पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार,धनंजय क्षीरसागर,जालिंदर टेमघरे,मुळशी तालुका अध्यक्ष ओंकार मेमाणे, संतोष शेंडगे, गुरू कोळी, कुमार पंजलर, अमर काकडे,दीपक काळभोर तसेच कामगार महासंघाचे उपाध्यक्ष संकेत पोटे आदी उपस्थित होते.