महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत आहे. आगामी तीन वर्षेही सरकार पूर्ण करणार आहे. मात्र, भाजपमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्यातील अनेकजण महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत. ते जर महाविकास आघाडीत आले, तर त्या अर्थाने ते ‘भावी सहकारी’ होऊ शकतात, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगर येथील नूतन शासकीय इमारतीच्या पाहणीसाठी आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, अशोक भांगरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले, ‘राज्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे. त्याचे पंचनामे होणे अद्याप बाकी आहे. पाथर्डी, शेवगाव या दोन तालुक्यांमध्ये शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल’, असे थोरात यांनी सांगितले.

अधिक वाचा  सीरमचे लस उत्पादन ५०% कमी; पूनावालांनी सांगितलं हे कारण….

राज्य चालवताना आम्ही कोटय़वधी रुपयांचे कर्ज काढतो. मात्र, दुसरीकडे आमच्या हक्काचा 30 ते 40 हजार कोटींचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडे अडकलेला आहे. ते पैसे वेळेत देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यांनी ते तत्काळ दिले पाहिजे, असेही थोरात म्हणाले.