दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या महिलांच्या अत्याचाराविरोधात विद्येचे माहेर घर म्हणून संपूर्ण जगप्रसिद्ध असलेल्या मानाच्या या पुण्यनगरीत दिवसेंदिवस महिला असुरक्षित होत आहेत एकदा या अशा नराधमांना महारष्ट्र पोलिसांनी हैदराबाद पॅटर्न वापरला पाहिजे जेणेकरून या अशा गैरकृत्यांना चाप बसेल, व अशी ग़ैरकृत्य परत कोणी करणार नाही ही मागणी करत पतित पावन संघटना पुणे तर्फे पुणे न्यायलयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली.

ज्या महिला भगिनींना पुण्यात कुठेही असुरक्षित वाटत असेल त्यांच्यासाठी 24×7 पतित पावन पाठीशी उभी असून, +918793356366 या नंबर वर संपर्क साधा. आम्ही त्वरित आपल्या मदतीसाठी येऊ, सर्व तरुणांना व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर रहावे असे आव्हाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे .

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

यावेळी राजाभाऊ पाटिल, मनोज नायर, दिनेश भिलारे, गोकुळ शेलार, विश्वास मनेरे, स्वप्नील नाईक, नीलेश जोशी, अरविंद परदेशी, योगेश वाडेकर,यादव पुजारी, विजय क्षीरसागर, विजय गावडे, अनिकेत बांदल, अमर काकड़े, सूरज पोटे, विनायक ठाकुर,शैलेश उनवणे हे उपथित होते.