पुणे : पंढरपूर विजयाची पुनरावृत्ती पुणे मनपा निवडणुकीत होईल,आणि पुन्हा भाजपची सत्ता येईल असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी कोद्रे नगर,शेवाळेवाडी येथे आयोजित भव्य कोरोना लसीकरण शिबीर कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले

यावेळी प्रमुख पाहुणे आमदार राहुल कुल,भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुजित मोडक, व्यापार उद्योग सेल जिल्हा उपाध्यक्ष सुनील उडताले,युवा मोर्चाचे हवेली तालुका उपाध्यक्ष सूरज बीरे,उपाध्यक्ष अंकुश जाधव, सरचिटणीस दिनेश भंडारी, राम खेडेकर, अविनाश कोदरे, कैलाश जैस्वाल, गणेश कांबळे, रुपेश माने, धनंजय कसबे, उरुळी देवाची अध्यक्ष महेश भाडळे, एम.के पांडे, हृद्यानंद प्रसाद, ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष जयप्रकाश शहा, सारिका पवार, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिक वाचा  अवलियाचा जन्मदिनी भीमसंकल्प! चिन्हरुपी भस्मासुराचा वध!

भाजप नेते राहुल शेवाळे यांच्या अटल आरोग्य रथ उपक्रमातर्गत पुरंदर-हवेली मतदारसंघात 100 हुन अधिक गावात आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात कोरोना लसीकरण मोहीमेचा फायदा हजारो नागरिकांना झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोना विरोधातील लढाईला राहुल शेवाळे यांनी उत्तम साथ दिली आहे असे मत आमदार राहुल कुल यांनी बोलताना व्यक्त केले.

कोरोनाचे संकट अद्यापही टळले नाही,नागरिकांमध्ये कोरोनासह  आरोग्याबाबतीत जनजागृती करत आरोग्य शिबिरे गावोगावी आयोजित केली आहेत. प्रत्येक गावात नागरिकांनी आरोग्य रथ यात्रेला उत्तम प्रतिसाद दिला. आजही शेवाळेवाडी परिसरात हजारो नागरिक कोरोना लसीपासून वंचित असल्याने शिबिराचा फायदा सर्व महिला व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी लसीकरण शिबिराचे आयोजक राहुल शेवाळे यांनी केले.

अधिक वाचा  महापालिका निवडणूक लांबणीची शक्यता; प्रतीक्षा सरकारच्या अधिसूचनेची

यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नागरिकासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.