या स्पर्धेत सौ.भागीर्थी लक्ष्मण लोमटे या प्रथम आल्या आहेत. द्वितीय क्रमांक सौ. सोजरबाई फकिरजी टेळे, तृतीय क्रमांक सौ. सुनीता बालाजी इरकर, चतुर्थ सौ.कविता बाळासाहेब सावंत आणि पाचवा क्रमांक सौ. आश्विनी आत्माराम शिंदे यांनी मिळवला आहे. याउत्तेजनार्थ म्हणून विश्वनाथ इरकर, सौ. शिवकन्या स्वामी, सौ.सुलन टेळे, सौ. लोपाबाई टेळे, सौ.शिवानी लोंढे, सौ.लक्ष्मीबाई टेळे, सौ. हिरकणा टेळे, सौ.भागीरथी जाधव, सौ. बालिका भिसे, सौ.सखुबाई साबळे आणि सौ. कुसुमबाई स्वामी यांना गौरविण्यात आले.

शिराढोण : यंदाच्या गणेशोत्सवावर गेल्या वर्षीच्याप्रमाणे कोरोनाचे संकट असले तरीही महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि शिवशंभु युवा प्रतिष्ठान दाभा यांच्या वतीने गौरी गणपती निमित्त सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करुन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. हनुमान मंदिर दाभा याठिकाणी हा बक्षिस वितरण समारंभ झाला. मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक सचिव सौ. स्वाती महेश टेळे  यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शिवशंभु युवा प्रतिष्ठान दाभा यांचे विशेष सहकार्य लाभले.

अधिक वाचा  ५०/५० ही पुडी.....हे तर पाच वर्षे पद; राऊत

यावेळी शिराढोण पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक वैभव नेटके,जेष्ठ पत्रकार अमोल चंदेल, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष प्रा. वर्षा जाधव, सरपंच बाबा टेळेपाटील,तंटामुक्ती अध्यक्ष फकिरजी टेळे, शिवव्याख्याते कुलदीप गायकवाड, पोलीस पाटील रावसाहेब टेळे, ऍड. प्रदीप टेळेपाटील,आकाश टेळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेत सौ.भागीर्थी लक्ष्मण लोमटे या प्रथम बक्षीस घेऊन पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या.  द्वितीय क्रमांक मिक्सर सौ. सोजरबाई फकिरजी टेळे, तृतीय क्रमांक कुकर सौ. सुनीता बालाजी इरकर, चतुर्थ डिनर सेट सौ.कविता बाळासाहेब सावंत आणि पाचवा क्रमांक ज्यूसर सेट सौ. आश्विनी आत्माराम शिंदे यांनी मिळवला आहे. याउत्तेजनार्थ पूजेचे ताट म्हणून विश्वनाथ इरकर, सौ. शिवकन्या स्वामी, सौ.सुलन टेळे, सौ. लोपाबाई टेळे, सौ.शिवानी लोंढे, सौ.लक्ष्मीबाई टेळे, सौ. हिरकणा टेळे, सौ.भागीरथी जाधव, सौ. बालिका भिसे, सौ.सखुबाई साबळे आणि सौ. कुसुमबाई स्वामी यांना गौरविण्यात आले.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

204 स्पर्धकांनी गौरी गणपती सजावट स्पर्धेत सहभाग घेतला होता. पारंपरिक आकर्षक सजावट, स्वच्छता, रांगोळी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक संदेश अश्या प्रमुख पाच निकष ठेऊन सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या पारितोषिक निवडण्यात आले.

याप्रसंगी महेश टेळे, शिवशंकर होनराव, ओमकार इरकर, सुभाष टेळे, अशोक पटणे, भैरवनाथ सावंत, इंद्रजीत टेळे, बसलींग स्वामी, सुधाकर जाधव यांचा विशेष सन्मान समस्त गावकऱ्यांच्या गोविंद टेळे (गुरुजी) यांनी केला. कार्यक्रमासाठी दत्तात्रय टेळे, गणेश लोमटे,संदिपान जाधव, राजाभाऊ होनराव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महेश टेळे आणि आभार ऍड प्रदीप टेळे यांनी मांडले. कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करत महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.