मनातील भक्तीला डोक्यातील कल्पकतेची साथ मिळाली तर निर्माण होणारी कलाकृती अकल्पित असते याची जाणीव कर्वेनगर येथील शितलताई बराटे यांच्या घरातील गौरी सजावट स्पर्धेचा देखावा पाहिल्यानंतर प्रत्येक गणेश भक्ताला झाल्याशिवाय राहणार नाही.


ताईंनी यंदाचा गणपती व गौरी सजावट देखावा यांची संकल्पना करताना भजनी मंडळी या विषयावर देखावा करण्याचा संकल्प केला; परंतु सर्व साहित्य आणि पात्रे साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि योजलेली कल्पकता याचा विचार करता आपल्या आजूबाजूला असलेल्या घरातील वस्तूंचा सुयोग्य वापर करून हे आकर्षक देखाव्याचे कार्य पार पडले आहे. जसे घरातील चराचरात पूर्वीपासूनच ईश्वर आशीर्वाद असलेल्या या घरातील प्रत्येक वस्तूचा ‘श्री’ उपयोग झाला अन भजनी मंडळींचा हा सुयोग्य देखावा तयार करण्यात आला आहे.

अधिक वाचा  पुणेरी निषेध! चूक नसताना गाडी उचलली पुणेकरानं थेट ‘स्मारक’ च उभारलं!

शितल ताई सागर मराठी यांच्या मनात संकल्पना आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला या देखाव्याची कच्ची तयारी करण्यास सुरुवात केल्यानंतर भजनी मंडळी आणि वारकरी संप्रदायात नित्याने वापरल्या जाणाऱ्या साधनांचा (पेटी, पखवाज, टाळ, विना) या सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्यांनी किमान वीस पात्रे साकारण्याचा तस घेतला त्यानंतर सुचत गेल्या त्या संकल्पना आणि जुळत गेले ते साहित्य.

देखाव्यासाठी त्यांनी कोणताही मोठा खर्च न करता घरातील साहित्यांचा वापर करत आणि अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेरील वस्तू वापरत हा देखावा साकार केल्याने देखाव्याची कर्वेनगर परिसरामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. घरातील कळश्या, मुलाची कपडे, १२+२ गौरि मुकवटे, सुबक साड्या, यातून वारकरी साकारले आहेत.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय, भुजबळांनी केली घोषणा!

अनिता सुरेश बराटे, शैलेश कोंडे, सुनिता रोहिदास बराटे, वैष्णवी सागर बराटे, तेजश्री सुरेश बराटे यांच्या मदतीने शितल सागर बराटे यांनी हा कल्पक देखावा साकार केला आहे.