श्रीराम तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने हा उपक्रम राबविला असून सलग अकरा वर्षे श्रीराम तरुण मंडळ ट्रस्ट गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिर घेत आहे.

कोरोनाचे सावट असतानाही तरुणांनी उत्साहाने सुरक्षित सामाजिक अंतर राखून शासनाने सुचवलेल्या सर्व नियमांचे पालन करीत रक्तदान केले. शिबिराचे संयोजन ऋषिकेश मारणे यांनी केल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा  आमिर खानला महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे पण, 'या' एका गोष्टीची वाटते भिती