गांधीनगर : भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी रविवारी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ते आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भूपेंद्र पटेल गांधीनगरच्या राजभवनातच शपथ घेतील. तसेच मंत्रिमंडळाचे गठनही पुढील 1-2 दिवसात होईल.

गांधीनगरमध्ये होणार शपथ कार्यक्रम
भूपेंद्र पटेल यांच्या शपथ समारंभात केंद्रीयमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपचे अनेक वरिष्ठ नेते शपथ ग्रहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्री बनल्यानंतर भूपेंद्र यांनी काय म्हटले ?
भूपेंद्र पटेल यांनी म्हटले की, सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी गुजरातमधील विकासाचा रथ असाच पुढे नेत राहील. संघटनेला सोबत घेऊन पुढे चालायचे आहे.

अधिक वाचा  'दगडी चाळ २' सिनेमाला सलमान खानच्या विशेष शुभेच्छा

5 वर्षानंतर पाटीदार समुदायाचे नेते मुख्यमंत्री
भाजपने 5 वर्षानंतर पाटीदार समुदायातील व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून दिला आहे. मोदी – शाह यांनी आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हे राजकीय पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. गुजरातमध्ये पाटीदार समुदायाचे प्राबल्य अधिक आहे. भाजपच्या दोन दशकांपासून जारी असलेल्या विजय अभियानामध्ये या समाजाचे मोठे योगदान आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पाटीदार समाजाच्या आनंदीबेन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. 2016 साली त्यांनी राजीनामा दिला होता. आता पुन्हा राज्यात पाटीदार समाजाच्या प्रतिनिधीकडे मुख्यमंत्री पद देऊन, पार्टी हायकमांडने पाटीदार कार्ड खेळल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?
गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार असलेले भूपेंद्र पटेल यांनी निवड झाली आहे. गांधीनगरमध्ये भाजप आमदार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदी म्हणून पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. पटेल सोमवारी 13 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विजय रुपाणी यांनी 11 सप्टेंबरला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पटेल यांनी त्यांची जागा घेतली आहे. साधारणपणे मुख्यमंत्रिपदी नेमणूक होणाऱ्या सदस्याला 3 ते 4 टर्मचा अनूभव असतो. मात्र पटेल यांची आमदार म्हणून ही पहिलीच वेळ आहे. पटेल यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय, हे आपण जाणून घेऊयात.

अधिक वाचा  पुण्यात नवीन ९० ई-बसमुळे ९० हजार प्रवाशांची सोय

वैयक्तिक माहिती…

भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा 1 लाख 17 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. पटेल हे पाटीदार समाजातून आहेत. ते 59 वर्षांचे आहेत. ते अहमदाबादमधील शिलाज भागातील आहेत. पटेल यांनी सिव्हिल इंजिनिअरिगंमध्ये डिप्लोमा केलाय. भूपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मर्जीतले मानले जातात. विशेष म्हणजे गुजराच्या माजी मुख्यंमत्री आनंदीबेन पटेल यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय.

राजकीय कारकिर्द

पटेल यांनी आमदार होण्यापूर्वी 1999-2000 मध्ये गुजरात महानगरपालिकेचं स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं. तसेच ते मेमनगर नगरपालिकेचे नगराध्यक्षही होते. त्यानंतर पटेल हे थलतेज या प्रभाागातून 2010-2015 मध्ये नगरसेवकही होते. यानंतर पटेल यांनी 2015-17 मध्ये अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचं अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.